बैठकीला मनपा आयुक्त राजेश मोहिते, उपायुक्त गजानन बोकडे, शहर अभियंता महेश बारई, कॉग्रेस नेते विनोद दत्तात्रय, रामू तिवारी यांची उपस्थित
Bhairav Diwase. April 07, 2020
(आधार न्यूज नेटवर्क ग्रामीण प्रतिनिधी) स्वप्निल मंडोगडे डोंगरहळदी तुकुम
चंद्रपूर: चंद्रपूर जिल्ह्या देशात करोना विषाणूला थारा न देणारा जिल्हा ठरायला हवा. जिल्ह्यात एकाही व्यक्तीला करोना विषाणूची लागण होता काम नये. यासाठी प्रशासनाने व जनतेने देखील गफलतीत न राहता मागील 14 दिवस ज्याप्रमाणे कोरोनापासून बचावाच्या आपण यशस्वी ठरलो. त्याच प्रमाणे पुढचे 7 दिवस देखील त्यापासून बचावासाठी प्रशासनाने उपायोजना वाढवाव्या असे निर्देश खासदार बाळू धानोरकर यांनी दिले. ते चंद्रपूर महानगरपालीकेच्या आढावा बैठकीत बोलत होते. बैठकीला मनपा आयुक्त राजेश मोहिते, उपायुक्त गजानन बोकडे, शहर अभियंता महेश बारई, कॉग्रेस नेते विनोद दत्तात्रय, रामू तिवारी यांची उपस्थिती होती. देशात देखील मृत्यूची संख्या देखील वाढत आहे. जगात देखील इतर देशात हाहाकार पसरला आहे. चंद्रपूर जिल्ह्यात देखील या विषाणूचा एकही रुग्ण आढळून आलेला नाही. हि बाब आपल्या साठी निश्चितच सकारात्मक आहे. त्यामुळे आपला जिल्हा या भीषण महामारीतून समोरही बचावण्यासाठी आपन गफलातीत न राहता खबरदारी घेण्याचा सूचना खासदार बाळू धानोरकर यांनी केल्या. यावेळी त्यांनी रस्त्यावर विकणाऱ्या भाजीपाला व फळ विक्रेत्यांना मास्क व सॉनीटायझर वितरित करण्यात यावे, शहरात ८५ हजार माकणमालक याना त्यांना मास्क व सॉनीटायझर वितरित करण्यात यावे, भाजी मार्केट हा चांदा क्लब येथे सुरु करण्यात यावा त्यामुळे सोशल डिस्टन्स ठेवण्यात मदत होतील, घंटा गाडी व घरी भाजी विक्री करणारे हात ठेले यांची वेळ सकाळी ८ ते ११ ठेवण्यात यावी, अशा महत्वाचा सूचना खासदार बाळू धानोरकर यांनी चंद्रपूर शहर महानगर पालिका प्रशासनाला दिल्या. त्यासोबतच पोलिस विभाग, आरोग्य विभाग, वीज वितरण विभागाचे अधिकारी कर्मचारी तसेच, सफाई कामगारांचे त्यांनी आभार मानले. त्यासोबतच चंद्रपूरकरानी देखील खबरदारी घेत आवश्यक कामासाठीच घराबाहेर पाडण्याचे आवाहन खासदार बाळू धानोरकर यांनी यावेळी केले.