Click Here...👇👇👇

आ. सुधीर मुनगंटीवार यांच्‍या पुढाकाराने पोंभुर्णा शहरात गरीब व गरजूंना श्रीराम धान्‍य प्रसादाच्‍या किट्सचे वितरण

Bhairav Diwase
पोंभुर्णा शहरात या श्रीराम धान्‍य प्रसादाच्‍या किट्सच्‍या वितरण
Bhairav Diwase.    April 06, 2020
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी)स्वप्निल मंडोगडे डोंगरहळदी तुकुम, पोंभुर्णा
पोंभुर्णा: माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांच्‍या पुढाकराने पोंभुर्णा शहरात श्रीराम धान्‍य प्रसादाच्‍या किट्सचे वितरण करण्‍यात आले. श्रीराम नवमीच्‍या शुभमुहूर्तावर बल्‍लारपूर विधानसभा क्षेत्रात गरीब व गरजू नागरिकांना 10 हजार श्रीराम धान्‍य प्रसादाच्‍या किट्सचे वितरण करण्‍याचा संकल्‍प आ. सुधीर मुनगंटीवार यांनी जाहीर केला होता. बल्‍लारपूर शहरातून या उपक्रमाचा शुभारंभ करण्‍यात आला होता.
श्रीराम धान्‍य प्रसाद म्‍हणून वितरीत करण्‍यात येणा-या या जीवनाश्‍यक वस्‍तुंच्‍या किटमध्‍ये आटा (गव्‍हाची कणीक), तांदुळ,  बेसण,  तेल,  मीठ,  मिर्ची,  हळद, पारले बिस्‍कीट,  साखर, चहापत्‍ती,  डेटॉल,  बटाटे व कांदे या वस्‍तुंचा समावेश आहे. कोरोना विषाणुच्‍या वाढत्‍या प्रादुर्भावाच्‍या पार्श्‍वभूमीवर जाहीर करण्‍यात आलेल्‍या लॉकडाऊनच्‍या परिस्‍थीतीत गरीब व गरजू नागरिकांना या किट्सच्‍या माध्‍यमातुन मदतीचा हात देण्‍यात येत आहे. पोंभुर्णा शहरात या श्रीराम धान्‍य प्रसादाच्‍या किट्सच्‍या वितरणाप्रसंगी पोंभुर्णा तालुका भाजपाचे अध्‍यक्ष गजानन गोरंटीवार, भाजपा नेते प्रकाश धारणे, पोंभुर्णाच्‍या नगराध्‍यक्षा श्‍वेता वनकर, रजिया कुरैशी, ईश्‍वर नैताम, मोहन चलाख, कु. शारदा कोडापे, विजय कस्‍तुरे, नेहा बघेल, किशोर कावळे, अजित मंगळगिरीवार, मोहन चलाख, सुनिता मॅकलवार, पुष्‍पा बुरांडे आदींची प्रामुख्‍याने उपस्थिती होती.