Click Here...👇👇👇

CDCC Bank: चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या नवनियुक्त संचालकांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

Bhairav Diwase

मुंबई:- आज, १५ जुलै २०२५ रोजी चिमूर विधानसभा क्षेत्राचे आमदार कीर्तीकुमार (बंटी) भांगडिया आणि चंद्रपूरचे आमदार किशोर जोरगेवार यांच्या नेतृत्वाखाली चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या नवनियुक्त संचालकांनी मुंबई येथे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान संचालकांनी मुख्यमंत्र्याचा सत्कार केला.


याप्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी नवनियुक्त संचालकांचे भरभरून कौतुक केले आणि त्यांच्या पुढील यशस्वी वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या.


या अविस्मरणीय सोहळ्यात चिमूर विधानसभा क्षेत्राचे आमदार कीर्तीकुमार भांगडिया, आमदार किशोर जोरगेवार, नुकतेच शिवसेना (उबाठा) गटातून भाजपामध्ये प्रवेश केलेले संचालक रवींद्र शिंदे, माजी आमदार सुदर्शन निमकर, आवेश पठाण, गणेश तर्वेकर, गजानन पाथोडे, संजय डोंगरे, यशवंत दिघोरे, दामोधर मीसार, रोहित बोंमावार, निशिकांत बोरकर, नंदाताई अल्लूरवार, ललित मोटघरे, निशिकांत बोरकर यांच्यासह भाजप पदाधिकारी राजेंद्र बोरकर, विलास विखार, नरेंद्र स्वान, वासुदेव ठाकरे आणि इतर मान्यवर उपस्थित होते.