मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या राजकारणात अनेक घडामोडी घडत आहेत. त्या अनुषंगाने आता राज्याच्या कॅबिनेटमध्ये मोठे बदल होण्याची शक्यता सूत्रांकडून वर्तवली जात आहे. लवकरच महायुती सरकारमध्ये मंत्रिमंडळात फेरबदल होणार आहेत. काही इतर पक्षातील दिग्गजांना पक्षात घेऊन मग त्यांना मंत्रिमंडळात घेऊन मंत्रिपद दिलं जाईल, असं बोललं जात आहे. अनेक मंत्र्यांचे पत्ते कट केले जातील. खांदे पालट होईल, अनेक नव्या चेहऱ्यांना कॅबिनेटमध्ये संधी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तसेच यामुळे अनेक मंत्र्यांना धक्का बसणार असल्याचे बोललं जात आहे.
महायुतीत तणाव?
गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या राजकारणात घडत असलेल्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर हा संभाव्य मंत्रिमंडळ विस्तार अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. महायुती सरकारमध्ये लवकरच मंत्रिमंडळात मोठे फेरबदल होणार असून अनेक विद्यमान मंत्र्यांचे पत्ते कट केले जातील, असे बोललं जा आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या या ‘धक्का तंत्रा’ची सध्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरु आहे. यापूर्वी केवळ भाजपच्याच मंत्र्यांना याचा फटका बसेल अशी शक्यता वर्तवली जात होती. पण आता सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना आणि अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसमधील काही मंत्र्यांनाही याची झळ बसू शकते, असे बोललं जात आहे. यामुळे महायुतीतील तिन्ही घटक पक्षांमध्ये मोठी उलथापालथ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
नवीन चेहऱ्यांना संधी देणार का?
या मंत्रिमंडळ फेरबदलात अनेक नव्या चेहऱ्यांना कॅबिनेटमध्ये संधी मिळण्याची शक्यता आहे. पक्षसंघटनेत चांगले काम केलेल्या किंवा आपापल्या भागांमध्ये मजबूत पकड असलेल्या नेत्यांना मंत्रिपदे दिली जाऊ शकतात, असे संकेत मिळत आहेत. त्यासोबतच, “काही इतर पक्षातील दिग्गजांना पक्षात घेऊन मग त्यांना मंत्रिमंडळात घेऊन मंत्रिपद दिलं जाईल, असेही बोललं जात आहे. यामुळे विरोधकांमध्येही अस्वस्थता वाढण्याची शक्यता आहे.