Click Here...👇👇👇

पंतप्रधानांच्या आवाहनाला नागरीकांनी प्रतिसाद देत कोरोना विरोधातल्या या लढ्यात सहभाग

Bhairav Diwase
1 दिवा देशासाठी, 1 दिवा महाराष्ट्रासाठी, 1 दिवा गावासाठी 
   Bhairav Diwase.   April 05, 2020
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी)स्वप्निल मंडोगडे डोंगरहळदी तुकुम, पोंभुर्णा
पोंभुर्णा: देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्रभाई मोदी यांनी 5 एप्रिल रोजी रात्री 9.00 वा. 9 मिनिटे घरातले दिवे मालवून मेणबत्ती , पणती , मोबाईल फ्लॅश लाईट , टॉर्च या माध्यमातून बाल्कनीतून प्रकाश करण्याचे आवाहन देशवासियांना केले आहे. पंतप्रधानांच्या आवाहनाला नागरिकांनी प्रतिसाद देत कोरोना विरोधातल्या या लढयात योगदान दिले.ज्ञया सर्व कृती जरी क्षुल्लक वाटत असल्या तरी मनोबल उंचावणाऱ्या , मनोधैर्य वाढविणाऱ्या आहेत. दिवा लावून अंधःकार दूर करणे हे आमच्या भारतीय संस्कृतीचे संस्कार आहेत. आज कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर जो लढा आपण भारतीय देत आहोत त्या लढ्यात पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांनी जे आवाहन केले आहे . त्याला प्रतिसाद देत हा लढा एकसंधतेने जिंकू. पोंभुर्णा तालुक्यातील पोंभुर्णा, चेक आष्टा, आष्टा, सोनापुर, चेक बल्लारपूर, चिंतलधाबा, केमारा, देवाडा खुर्द, जामतुकुम, चेक फुटाणा, वेळवा, भिमणी, चेक नवेगाव, नवेगाव मोरे, जामखुर्द, डोंगरहळदी तुकुम, आंबेधानोरा, उमरी पोतदार, फुटाणा मोकसा, बोर्डा झुल्लुरवार, बोर्डा बोरकर, बोर्डा दिक्षित, घनोटी तुकुम, नविन गंगापुर, कसरगठा, रामपुर दिक्षित या गावात नागरीकांनी पंतप्रधानांच्या आवाहनाला प्रतिसाद देत कोरोना विरोधातल्या या लढ्यात सहभाग नोंदविला. आणि आपल्या घराच्या अंगणात, बाल्कनीत, घरात दिवे लावले.