Click Here...👇👇👇

चंद्रपूरातील रक्तदानाच्या उपक्रमात आज वैद्यकीय क्षेत्रातील मातृशक्तीने केले रक्तदान

Bhairav Diwase
आज रक्तदान करणाऱ्या वैद्यकीय क्षेत्रातील मातृशक्ती चे आ. सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केले आभार 
Bhairav Diwase.  April 05, 2020
(आधार न्युज नेटवर्क मुख्य संपादक) भैरव दिवसे, जिल्हा चंद्रपूर
चंद्रपूर: कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर रक्तपेढयामध्ये जाणवणारा रक्ताचा तुटवडा लक्षात घेत माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी केलेल्या आवाहनानुसार श्री रामनवमी पासून  चंद्रपूर येथील आय. एम. ए. सभागृहात लॉक डाऊन संपेपर्यंत दररोज 5 रक्तदात्यांना आवाहन करून रक्तदान करण्याचा उपक्रम त्यांच्या मित्र परिवारातर्फे राबविण्यात येत आहे.
आज या उपक्रमाच्या चौथ्या दिवशी शहरातील महिला डॉकटर्स सहभागी झाल्या व त्यांनी रक्तदान केले.डॉ कल्पना गुलवाडे, डॉ प्राजक्ता आस्वार, डॉ मनीषा वासाडे, डॉ पल्लवी इंगळे ,डॉ प्रीती चव्हाण , डॉ अपर्णा देवईकर यांनी आज रक्तदान केले. यावेळी डॉ. किरण देशपांडे, डॉ मंगेश गुलवाडे, प्रकाश धारणे , सुभाष कासनगोट्टूवार ,प्रशांत विघ्नेश्वर यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.प्रास्ताविक प्रशांत विघ्नेश्वर यांनी , संचालन डॉ गुलवाडे यांनी तर आभार प्रदर्शन डॉ पल्लवी इंगळे यांनी केले. आज रक्तदान करणाऱ्या वैद्यकीय क्षेत्रातील मातृशक्ती चे आ. सुधीर मुनगंटीवार यांनी आभार व्यक्त केले .