मजुरीसाठी तेलंगणा राज्यात गेलेली आई व इकडे महाराष्ट्रात वडिलाच्या मृत्यूमुळे पोरका झालेला बाळ अशा अडचणीत सापडलेल्या आई - मुलाची भेट.

Bhairav Diwase
तब्बल २५ दिवसानी आई मुलाची भेट घडली, प्रशासनाचे मानले आभार.
Bhairav Diwase.   April 26, 2020
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) राकेश एम गोलेपल्लीवार जिबगांव, सावली
सावली: मजुरीसाठी तेलंगणा राज्यात गेलेली आई व इकडे महाराष्ट्रात वडिलाच्या मृत्यूमुळे पोरका झालेला बाळ अशा अडचणीत सापडलेल्या आई - मुलाची भेट अखेर २५ दिवसांनी प्रशासनाने घडवून आणली.
बोरचांदली येथील कविता ही आपल्या पतीची तबेत ठीक नसल्यामुळे पतीला व आपल्या मुलाला घेऊन आपल्या माहेरी सावली तालुक्यातील खेडी येथे आपल्या आजारी पती व 10 वर्षाच्या मुलाला ठेऊन मिरची तोडण्याचे कामाकरिता ही माऊली तेलंगणा राज्यात गेली. जगात कोरोनाचे संकट आले देशात, राज्यात संचारबंदी लागू झाली. त्यामुळे या कुटुंबालाही  फटका बसला. त्यातच पती रुपेश रामटेके याची तब्येत अधिकच खालावली. पत्नीच्या नातेवाईकांनी सावली ग्रामीण रुग्णालयात त्याला भरती केले. परंतु पुढील उपचाराकरीता  मात्र गडचिरोली जिल्हा रुग्णालयात भरती केले. मात्र उपचारादरम्यान १ एप्रिल रोजी रुपेशचा मृत्यू झाला. तिकडे पत्नीला कळवले मात्र लॉकडाऊनमुळे येणे शक्य नव्हते, अश्रूशिवाय काहीच तिच्याकडे पर्याय नव्हता. नातेवाईकांनी मुलाला घेऊन जीवनसाथीशिवाय अंत्यसंस्कार पार पाडले. मात्र आई नाही व वडील नाही या विवनचनेत १० वर्षाचा संकेत दुःखी होता. ही बाब पंचायत समिती सभापती विजय कोरेवार व समाज माध्यमांनी लावून धरली. त्यामूळे जिल्हा प्रशासनाने त्या महिलेला आणण्यासाठी पुढाकार घेतला. जिल्हा प्रशासनाची तयारी चार दिवसापूर्वी झाली व त्यांनी महाराष्ट्र पोलीस संचालक यांचेकडे परवानगी मागितली. ही परवानगी मिळताच तेलंगाना राज्यात गाडी पाठवून त्या महिलेला घरी पोहचविले व मुलांची भेट घडवून आणली.
सदर महिला घरी आल्यानंतर पोलीस व आरोग्य विभागाच्या चमूने भेट दिली.  कोरोनाचा संसर्ग नियमानुसार डॉक्टरांनी तपासणी केली व तिला होम कोरेन्टाईन करण्यात आले आहे.
       तालुक्यात खेडी येथे मन हेलावून टाकणारी पहिली घटना तर दूसरी घटना उपरी येथे घडली.  जिल्हा प्रशासन,जिल्हा पोलीस अधीक्षक, जिल्हाधिकारी, पोलीस विभाग व  तेलंगणा प्रशासनाच्या प्रयत्नाने तब्बल २५ दिवसानंतर ही माउली खेडी येथे दि २५ एप्रिल ला सकाळी ११.००च्या सुमारास पोहचली. तेलंगणा राज्यातील खंमम जिल्हा कामेपल्ली तालुक्यातील भजातांडा या गावात मिरची तोडणी करण्याकरीता गेलेल्या कविताला महाराष्ट्रात आणण्यात आले. गावात आल्यानंतर सदर महिलेला डॉ सौरव गोबाडे प्रा.आ.केंद्र जिबगांव यांनी तपासणी केल्यानंतर  विलगीकरण करून ठेवण्यात आले आहे. त्या महिलेला आणण्याचे सहकार्य सहाय्यक पोलिस निरीक्षक म्हस्के व पोलीस कर्मचारी, पंचायत समिती सावली सभापती विजय कोरेवार, सरपंच मोहिनी भडके, पोलीस पाटिल कृपाल दूधे, उपसरपंच नरेंद्र राचेवार, ग्रामसचिव वाकळे उपस्थित होते. त्या माऊली व मुलांची व्यथा महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघांनी वेब व पेपरच्या माध्यमातून समाजासमोर व प्रशासनापुढे आनण्याचे काम केले.आई व मुलांची भेट घडवून आल्याने त्या माऊलीने सर्वाचे आभार मानले.