Click Here...👇👇👇

जितेंद्र पिंपळशेंडे यांच्या कडून 1st to 8th class पर्यंत च्या मुला-मुलींना गावातील जि. प. उच्च. प्राथ. शाळा चेक आष्टा येथे सोशल डिस्टंसिंगचे योग्य पालन करून तोंडाला मास्क वापरुन शिक्षण.

Bhairav Diwase
उडाण द कॅरिअर अकादमी संचालक जितेंद्र सुरेश पिंपळशेंडे रा. चेक आष्टा
Bhairav Diwase.   June 10, 2020
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) स्वप्निल मंडोगडे डोंगरहळदी तुकुम, पोंभुर्णा
पोंभुर्णा:- काेराेना विषाणू ने जगाला हादरवून साेडलेला आहे. भारतातही काेराेना ग्रस्तांची संख्या झपाटय़ाने वाढत आहे. राज्यातही कोरोना विषाणू ने कहर घातलेला आहे. चंद्रपूर जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण आढळून आले, त्यासाठी प्रशासनाकडून याेग्य ती खबरदारी घेण्यात येत आहे. सध्या जगभरात कोरोना व्हायरसने थैमान घातले असून, त्याचे पडसाद भारतातही दिसू लागले, महाराष्ट्रात सुद्धा कोरोना चे रुग्ण आढळले, या कोरोना वर मात करण्यासाठी शासनाने लॉकडाऊन जाहीर करून, शासनस्तरावर अनेक उपाययोजना सुरू केल्या आहेत. सध्या कोरोना संसर्ग रोखण्यासाठी सार्वत्रिक स्तरावर सर्वांच्या सहकार्याने एक विश्वयुद्धा प्रमाणे लढा देत आहे. देशातील प्रत्येक सामाजीक, आर्थीक, राजकीय, स्तरावरुन मदतीचा ओघ सुरु झाला. प्रत्येक संघठना, संस्था, व्यक्ती या लढाईत आप-आपला योगदान  देत आहे. 

त्याच पार्श्वभूमीवर पोंभुर्णा तालुक्यातील ग्रामपंचायत चेक आष्टा गावातील जितेंद्र सुरेश पिंपळशेंडे हा लहान पणापासूनच खोडकर, हुशार, बुद्धिमान, सतत चांगले कामामध्ये गुंतलेले. त्याच शालेय शिक्षण पोंभुर्णा येथे झाल. नंतर बी.ई. चे शिक्षण सेवाग्राम येथे घेऊन, चंद्रपूर येथे एक, दिड वर्षांपूर्वी पासून स्पर्धा परीक्षा साठी स्वत: च्या प्रयत्नातून उडाण द कॅरिअर अकादमी संस्था सुरू करुन चांगल्याप्रकारे मुला- मुलींना प्रशिक्षण देण्यात येत आहे. परंतु सध्याच्या परिस्थितीत कोविड-१९ या भयंकर रोगान आपल्या देशावर थैमान घातले. त्यामुळे काही काळासाठी ॲकॅडमी बंद करावी लागली. म्हणुन जितेंद्र नी आपल्या गावाला येऊन ग्रामपंचायत चेक आष्टाचे सरपंच पिंपळशेडे साहेब आणि गावकऱ्यांना बातचीत केली. की आपल्या गावातील मुलं या कोरोना काळामध्ये घरीच राहून मस्ती करत आहे. परंतु काही वेळासाठी मी त्यांना शिकवील. यावे ज्ञानासाठी, निघावे सेवेसाठी या म्हणीप्रमाणे गावामध्ये आपल्या खेड्यापाड्यात मुलं-मुली सुध्दा चांगले शिकले पाहिजे. त्यांनी पण दुसऱ्यांची सेवा केली पाहिजे. म्हणुन 1st to 8th class पर्यंत च्या मुला-मुलींना गावातील जि. प. उच्च. प्राथ. शाळा चेक आष्टा येथे सोशल डिस्टंसिंगचे योग्य पालन करून तोंडाला मास्क वापरुन शिक्षण देत आहे. आणि गावकऱ्यांनी पण योग्य तसं सहकार्य करत आहेत. 
    काल जितेंद्र यांचे मेहुणे सतिश वाढई आणि आशा वाढई यांच्या लग्नाचा ६वा वाढदिवस होता. त्यानिमित्ताने त्यांनी मुला- मुलींचे प्रोत्साहन वाढविण्यासाठी  मुला-मुलींना पेन व बुक च वाटप करण्यात आले. आणि सरपंचांन कडुन सॅनिटायझर व मास्क पण देण्यात आले.


उडाण द कॅरिअर अकादमी संचालक माझा लाडका मेहुणा जितेंद्र सुरेश पिंपळशेंडे. माझ्या गावात मुलांचे रोज क्लास घेऊन त्यांना प्रबळ बनविण्याचा प्रयत्न करीत आहे. या काळात लोक पैश्यांची किंमत करतात. पण तू आपल्या जन्मभूमीचा उध्दार तथा पांग शैक्षणिक तू फेडत आहे. जितू (Be. Civil) सलाम तुझ्या कार्यास.
:- श्री. सतिश वाढई तांत्रिक अधिकारी, ( मनरेगा) पंचायत समिती पोंभुर्णा

नयी सोच...... नयी उडान. मला नेहमी मार्गदर्शन करणारे माझे मेहुणे सतीश दादा यांचा काल लग्नाचा ६वा वाढदिवस होता. त्यानिमित्ताने त्यांनी मुला- मुलींचे प्रोत्साहन वाढविण्यासाठी  मुला-मुलींना पेन व बुक वितरण केले.  त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो.
:- जितेंद्र सुरेश पिंपळशेंडे (Be. Civil) 
संचालक, उडाण द कॅरिअर अकादमी चंद्रपुर


जितू खुप हुशार तडफदार युवा नेतृत्व असलेला व्यक्ती आहे. त्याला नेहमी पासून समाजकार्य करायची आवड आहे. तो चंद्रपूर येथे एक, दिड वर्षांपूर्वी पासून स्पर्धा परीक्षा साठी स्वत: च्या प्रयत्नातून उडाण द कॅरिअर अकादमी संस्था सुरू करुन चांगल्याप्रकारे मुला- मुलींना प्रशिक्षण देत आहे. गावात येऊन  1st to 8th class पर्यंत च्या पर्यंत च्या मुला-मुलींना गावातील जि. प. उच्च. प्राथ. शाळा चेक आष्टा येथे सोशल डिस्टंसिंगचे योग्य पालन करून तोंडाला मास्क वापरुन शिक्षण देत आहे. पुढच्या वाटचाली साठी तुला खूप खूप शुभेच्छा.
:-श्री. जयंत पिंपळशेंडे, सरपंच 
ग्रामपंचायत चेक आष्टा


उडाण द कॅरिअर अकादमी चंद्रपुर