शिबिरास महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर सुनील साकुरे यांनी ऑनलाइन उद्घाटन पर शुभेच्छा देऊन त्या रक्तदान शिबिरास मार्गदर्शन.
Bhairav Diwase. June 10, 2020
पोंभुर्णा:- सर्वोदय शिक्षण मंडळ द्वारा संचालित, सुशिलाबाई रामचंद्रराव मामीडवार कॉलेज ऑफ सोशल वर्क, पडोली चंद्रपूर या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ सुनील साकुरे यांच्या मार्गदर्शन व नियंत्रणात तसेच राष्ट्रीय सेवा योजना व यु. पी योद्धा क्रीडा मंडळ उमरी पोद्दार व सामाजिक ग्राम परिवर्तन अभियान यांच्या संयुक्त विद्यमाने महाविध्यालयाचे विद्यार्थी श्री अंकुश उराडे यांच्या संयोजनात आयोजित भव्य रक्तदान शिबिर संपन्न झाले.
या संपन्न शिबिरास महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर सुनील साकुरे यांनी ऑनलाइन उद्घाटन पर शुभेच्छा देऊन या रक्तदान शिबिरास मार्गदर्शन केले व आयोजकांचे खूप खूप अभिनंदन तसेच कौतुक केले.
संपन्न होत असलेले हे शिबिर विशेषतः महाविद्यालयाचे व कोरोना महामारी संकटातील तसेच राज्य सरकार यांच्या आवाहनानंतरचे हे तिसरे शिबिर आहे. यापूर्वी जिवती तालुक्यातील हिमायतनगर येथे महाविद्यालयाचा विद्यार्थी श्री. जिवन तोगरे यांनी आयोजित केलेल्या शिबिरात 42 रक्तदात्यांनी रक्तदान केले, तर दुसरे भव्य रक्तदान शिबिर राजुरा तालुक्यातील हर्दोना खुर्द या गावात महाविद्यालयाचे विद्यार्थी श्री अक्षय टेकाम यांनी आयोजित केले यामध्ये 36 रक्तदात्यांनी रक्तदान केले, तर आज पोंभूर्णा तालुक्यातील उमरी पोतदार येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन श्री अंकुश उराडे आणि सामाजिक ग्राम परिवर्तन अभियानचे श्री. प्रेम कासदेकर यांच्या संयोजनात होऊन 26 रक्तवीर रक्तदात्यांनी रक्तदान केले. असे आजपर्यंत 102 रक्तवीर रक्तदात्यांनी शिबिरात रक्तदान केले.
या संपन्न रक्तदान शिबिरास जिल्हा सामान्य रुग्णालयाचे रक्त संक्रमण अधिकारी डॉक्टर आनंत हजारे, समाजसेवा अधीक्षक श्री. पवार सर व त्यांची चमू तसेच गावाच्या सरपंच, उपसरपंच तसेच युपी योद्धा युवक मंडळाचे सर्व पदाधिकारी आणि गावातील रक्त वीर रक्तदाते या सर्वांच्या सहकार्याने हे रक्तदान शिबिर यशस्वीरित्या संपन्न झाले. या शिबिराच्या यशस्वितेसाठी गावातील तरुण युवकांनी अथक परिश्रम घेतले. या एकंदर शिबिराचे आयोजन नियोजन करण्यासाठी प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष मार्गदर्शन करणारे , महाविद्यालयाचे प्राचार्य, उपप्राचार्य, राष्ट्रीय सेवा समन्वयक तसेच सर्व प्राध्यापक वृद्धांचे आयोजकांच्या वतीने आभार म्हणून शिबिराची सांगता करण्यात आली.
या कोरोना संकट काळात महाविध्यालय राबवित असलेल्या विविध समाजोपयोगी नाविन्यपूर्ण कार्यक्रम व उपक्रमे जिल्ह्याच्या शैक्षणिक क्षेत्रात सध्या चर्चेचा व समाजोपयोगी विषय ठरलेला आहे.