जितेंद्र सोनटक्के यांना कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाने केले निलंबित.
Bhairav Diwase. June 10, 2020
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) अमित उइके, गोंडपिपरी
गोंडपिपरी:- निष्काळजी आणि बेजबाबदारपणाचा ठपका ठेऊन 4 जून रोजी झालेल्या सभेत ठराव पारित करून गोंडपिपरी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव जितेंद्र सोनटक्के यांना कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाने निलंबित केले आहे. तत्काळ एका विशेष समितीचे गठन करून त्यांच्यामार्फत सचिवांच्या कामकाजाची चौकशी सुरू आहे. यापूर्वी 26 ऑक्टोबर 2018 रोजी गोंडपीपरी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीची सभा पार पडली. सदर सभेत सचिवावर बेजबाबदार पणाचा ठपका ठेवण्यात आला. त्यांनतर पुन्हा 4 जून 2020 रोजी संचालक मंडळाच्या सभेत 13 सदस्यांनी बहुमताने त्यांच्यावर निलबनाची जारीवाही केली. त्यांचा प्रभार कनिष्ठ लिपिक अनिल चौधरी यांच्याकडे दिला आहे.