जुनी ग्रामपंचायत ते माजी पंचायत समिती सदस्य सौं. कल्पनाताई राखडे यांच्या घराकडे जाणाऱ्या रस्त्याचे रीतसर भूमिपूजन.
Bhairav Diwase. June 02, 2020
सावली:- सावली तालुक्यातील पाथरी येथील जुनी ग्रामपंचायत ते माजी पंचायत समिती सदस्य सौ कल्पनाताई राखडे यांच्या घरापर्यंत जाणारा रस्ता सिमेंट काँक्रेट व्हावा अशी प्रभागातील जनतेची मागणी कित्तेक दिवसापासून होती. वारंवार मागणी करीत असताना आज मागणीची पूर्तता होऊन रस्ताच्या कामाचे भूमिपूजन होऊन प्रभागातील जनतेणे आभार मानले. ही मागणी कित्तेक दिवसापासून असताना ग्रामपंचायत पाथरीचे सरपंच श्री राजेश सिद्धम यांनी सरपंच पदावर रुजू होताच मागणीची दखल घेत प्रभागातील लोकांना आश्वासन दिला कि या रस्त्याचे काम लवकरच करण्यात येईल त्या अनुषंगाने सरपंच श्री राजेश सिद्धम यांनी 14 वा वित्त आयोग निधीतून आपल्या मासिक सभेमध्ये विषय ठेवून मागणीची पूर्तता केली व आज दि. 9/6/2020 रोजी जनतेच्या मागणीची पूर्तता करीत जुनी ग्रामपंचायत ते माजी पंचायत समिती सदस्य सौं. कल्पनाताई राखडे यांच्या घराकडे जाणाऱ्या रस्त्याचे रीतसर भूमिपूजन करून प्रभागातील नागरिकांच्या मागणीची पूर्तता केली. प्रभागातील नागरिकांनी सरपंच श्री राजेश सिद्धम यांचे आभार मानले. या वेळी पाथरी येथील सरपंच श्री राजेश सिद्धम, सदस्य अनिल मडावी, रामूजीं ठिकरे, नितीनजी दुवावार, ग्रामपंचायत पाथरी येथील शिपाई श्री प्रकाश सोनटक्के, देविदास चौधरी, पंकज चौधरी, माजी पंचायत समिती सदस्य सौ कल्पनाताई राखडे, व गावकरी उपस्थित होते.