रॅक पॉइंटवर जाऊन मा हंसराज जी अहीर यांनी केली पाहणी.
Bhairav Diwase. July 10, 2020
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) वैभव एनपल्लीवार, चंद्रपूर
चंद्रपूर:- चंद्रपूर जिल्यातील शेतकरी बांधव युरिया खताची आतुरतेने वाट बघत असताना आज चंद्रपूर येथे युरिया खताची रॅक लागली असता. रॅक पॉइंटवर जाऊन मा हंसराज जी अहीर यांनी पाहणी केली. सोबतच चंद्रपूर रेल्वे स्थानकावर रेल्वे साइडिंग परिसरात सर्वत्र घाण असताना तिथे पूर्णत्वास आलेल्या रेल्वे साइडिंग डांबरीकरणाची सुद्धा त्यांनी पाहणी करून कामाबद्दल समाधान व्यक्त केले. यावेळी रॅक पॉईंटवरून युरिया खताची पहिली गाडी निघाली त्या गाडी ड्राइवर चे जि. प. चंद्रपूर कृषी व पशुसंवर्धन सभापती श्री सुनील उरकुडे यांनी स्वागत केले. यावेळी जिल्हा कृषी विभागाचे अधिकारी श्री किरवे जी, श्री पाटील जी व अन्य अधिकारी उपस्थित होते