एड. वामनराव चटप यांच्या मार्गदर्शनाखाली शेतकरी संघटना व विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या वतीने गडचांदूर येथील उप कार्यकारी अभियंता यांच्या कार्यालयात वीजबिल वापसी आंदोलन.

Bhairav Diwase

दि 10 / 07 /  2020 रोजी दु.12 वाजता म. रा. वि. म. कार्यालयात जाऊन "वीज बिल वापसी" आंदोलन.
Bhairav Diwase.    July 10, 2020

(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) सतीश बिडकर कोरपना
कोरपना:-
आज एड. वामनराव चटप यांच्या मार्गदर्शनाखाली शेतकरी संघटना व विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या वतीने गडचांदूर येथील उप कार्यकारी अभियंता यांच्या कार्यालयात वीजबिल वापसी आंदोलन करण्यात आले.
दि 10 / 07 /  2020 रोजी दु.12 वाजता म. रा. वि. म. कार्यालयात जाऊन "वीज बिल वापसी" आंदोलन झाले.

यावेळी शेतकरी संघटनेचे प्रभाकर पा. दिवे, मदन पा. सातपुते, दीपक चटप, प्रवीण एकरे, आशिष पा. मुसळे, वामनराव पा. बोबडे, अरुण पा. रागीट, कालीदास पा. उरकूडे, दिलीप पा. आस्वले, वासुदेव पा. गौरकार, स्वप्नील झुरमुरे, आतिश पिदुरकर, यशवंत आवारी आदी उपस्थित होते.

आंदोलनकर्त्यांनी खालील मागण्या केल्या-

1. लॉकडॉऊन च्या काळात व्यवसाय, उद्योग, कारोबार पूर्णतः बंद होते त्यामुळे रोजगार सुद्धा बंद होते म्हणून या काळातील घरगुती ग्राहक, व्यावसायिक, उद्योजक व कारोबारी यांचे 24 मार्च 2020 पासूनचे 3 महिन्याचे वीज बिल माफ करण्यात यावे व ग्राहकांना देण्यात आलेली विजेची बिले वापस घेण्यात यावी.

2. यापुढे 200 युनिट पर्यंत वीज मोफत देण्यात यावी.

3. विजेचा उत्पादन खर्च केवळ 2.50 रु. असताना घरगुती ग्राहकांना सरासरी 7.50 रु. प्रती युनिट व व्यावसायिक, औद्योगिक वापराला आकारले जाणारे 11.50 रु. प्रती युनिट हे दर तातडीने निम्मे करण्यात यावे.

4.  विदर्भात गेल्या 3 वर्षात सततची दुष्काळी परिस्थिती असल्यामुळे शेती पंपाचे थकीत वीज बिल कायमचे संपवण्यात यावे.

5. विदर्भात शेतकऱ्यांना पूर्ण वेळ पूर्ण दाबाची वीज देण्यात यावी व मागेल त्याला वीज कनेक्शन देण्यात यावे व लोडशेडिंग कायमची संपवण्यात यावी.

यावेळी शेतकरी संघटनेचे प्रभाकर पा. दिवे, मदन पा. सातपुते, दीपक चटप, प्रवीण एकरे, आशिष पा. मुसळे, वामनराव पा. बोबडे, अरुण पा. रागीट, कालीदास पा. उरकूडे, दिलीप पा. आस्वले, वासुदेव पा. गौरकार, स्वप्नील झुरमुरे, आतिश पिदुरकर, यशवंत आवारी आदी उपस्थित होते.