Click Here...👇👇👇

कोरोना काळात अत्यावश्यक सेवा देणारे कोरोना योद्धेच शुभेच्छांचे खरे मानकरी:- आ.बंटी भांगडीया

Bhairav Diwase
छत्रपती शाहू महाराज क्रीडा मंडळ भिसी द्वारे आयोजित रक्तदान शिबिर व कोरोना योद्धे यांचा सत्कार कार्यक्रम.
Bhairav Diwase.    July 19, 2020
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) अरविंद राऊत, चिमूर
चिमूर:- चिमूर विधानसभा क्षेत्राचे आमदार बंटी भांगडीया यांच्या वाढदिवसानिमित्त छत्रपती शाहू महाराज क्रीडा मंडळ यांचे वतीने कोरोना काळात अत्यावश्यक सेवा पुरविणारे कोरोना योद्धे यांचा सत्कार व रक्तदान शिबिर कार्यक्रम आयोजीत केला होता.या कार्यक्रमाला सत्कारमूर्ती किर्तीकुमार भांगडीया यांची उपस्थिती होती.कोरोना काळात अत्यावश्यक सेवा पुरविणारे डॉक्टर, नर्स,पोलीस कर्मचारी,  पोलीस पाटील, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर, मेडिकल दुकानदार, किराणा दुकानदार, तलाठी, राशन दुकानदार, शिक्षक यांचा आमदार बंटीभाऊ भांगडीया यांचे हस्ते भव्य सत्कार करण्यात आला.सध्या कोरोनामुळे रक्त साठ्याची गरज लक्षात घेता श्री छत्रपती शाहू महाराज क्रीडा मंडळ यांनी रक्तदान शिबिर आयोजीत केले.
     आमदार बंटी भांगडीया यांचे वाढदिवसाच्या निमित्ताने छत्रपती शाहु महाराज यांच्या वतीने भव्य सत्कार करण्यात आला त्याच प्रमाणे भारतीय जनता पार्टी भिसी यांच्या वतीने व महिला आघाडीच्या वतीने भव्य सत्कार करण्यात आला.कार्यक्रमादरम्यान मार्गदर्शन करतांना आमदार बंटी भांगडीया म्हणाले की वाढदिवस कार्यक्रमा प्रसंगी शुभेच्छांचा मानकरी मी नाही तर या ठिकाणी उपस्थित कोरोना काळात अत्यावश्यक सेवा सेनारे कोरोना योद्धे हे सुभेच्छांचे खरे मानकरी आहेत.

   या कार्यक्रमाला माजी राज्यमंत्री डॉ. रमेशकुमार गजभे, जेष्ठ भाजपा नेते बापुरावजी बोमेवार,जेष्ठ नेते वसंत वारजुकर, बंडू जावळेकर, पंचायत समिती सदस्य प्रदीप कामडी, सचिन गाडीवार, छत्रपती शाहू महाराज क्रीडा मंडळाचे पदाधिकारी,भारतीय जनता पार्टी शाखा भिसीचे पदाधिकारी, महिला आघाडी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. सोशल डिस्टनस नियमाचे पालन करत कार्यक्रम संपन्न झाला.