किटाळी ग्राम सभेची केली अवहेलना
Bhairav Diwase. July 11, 2020
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) अरविंद राऊत, चिमूर
चिमूर:- चिमूर तालुक्यातील जंगलाशेजारी असलेल्या गावातील काही नागरिकांनी अनेक वर्षांपासून शेती करून आपले कुटुंब उदरनिर्वाह करीत असताना शेती हंगाम सुरू असताना मात्र वनविभागाने तुघलकी कारभार करीत बी बियाणे पेरल्यावर उभ्या होऊ घातलेल्या पिकावर जेसिबी ने उध्वस्त करण्याचे प्रकार करीत आहे अश्यातच किटाडी येथील अतिक्रमित शेतकऱ्यांची पिके नासधूस करीत असताना किटाडी येथील ग्रामसभा त्या घटना स्थळावर जाऊन वन विभागाचे पीक उध्वस्त करण्याचे प्रकार बंद पाडले व तसे वन विभागाने आश्वासन दिले परंतु ग्राम सभा गावात परत आल्यावर वन विभागाने पुन्हा जेसीबी ने पिके उध्वस्त केली यामुळे वन विभागाने ग्रामसभेचा अवमान केलेला आहे शासन प्रशासनाने दखल घेत अतिक्रमित शेतकऱ्यांची शेती नासधूस करणे थांबविण्याची मागणी वन हक्क समिती किटाळी यांनी केलेली आहे .
अनुसूचित जमाती व इतर पारंपरिक वन निवासी अधिनियम 2006 नियम 2008 व सुधारणा नियम 2012 अन्वये नियम 8 (अ) व नियम 8( ज) नुसार सामूहिक वन हक्काचे हक्क पत्रामध्ये मुद्दा क्र 7 व 9 अन्वये प्राप्त अधिकारानव्ये मौजा किटाळी च्या ग्राम सभेला सर्वे क्र 124/1 ,223,224, 268, 269, 266,366,259, व 326 ज्याचे अनुक्रमे आराजी 14.27 , 14.03, 3.82, 2.08, 1.86, 1.21 ,0.73 , 1.34, 48, 1.10 , असे एकूण 173 .55 हे आर क्षेत्राचे संरक्षण पुनर्जीवन परीक्षण व व्यवस्थापन करण्याचा हक्क आहे तसेच उक्त अधिनियमातील कलम 3 पोटकलम 1 खंड झ नुसार निरंतर वापरासाठी यावर क्र 6 मध्ये नमूद क्षेत्रात हक्क असतो तेव्हा या क्षेत्रात कार्यवाही करीत असताना ग्रामसभेला अवगत करणे अनिवार्य आहे त्या अतिक्रमित जागा जबरानजोत धारकांची नसून ग्रामसभेची असल्याचे सुद्धा सांगण्यात आले
ग्रामसभेने यापूर्वी 21 जून 19 रोजी ग्रामसभेचा ठराव घेऊन सीमांकन करीता वनविभागास पत्र सादर केले होते परंतू आजपर्यत कोणतीही कार्यवाही केली नाही तसेच जिल्हाधिकारी यांनी स्थगिती चे आदेश वन अधिकारी धानकुटे व आदींना दाखविले तेव्हा त्या वनधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केले आणि आम्हाला माहिती नसल्याचे सांगत हात वर केले
ग्रामसभेच्या कार्य क्षेत्रात असलेले सर्व्हे नंबर 259 मधील जमिनीवर अतिक्रमित धारकांच्या भोगवटा शेतीवर ग्राम सभेला पूर्व सूचना न देता जेसीबी व ट्रॅक्टर उभ्या पिकात चालविली आहे यावर वन विभाग मात्र अतिक्रमित शेतकऱ्यांचे कुटुंब उध्वस्त करीत असल्याने संतापाची लाट पसरली आहे
वनविभागाने शासकीय अधी नियमांचे व आदेशाचे उल्लंघन केले आहे या प्रकाराची चौकशी करून अतिक्रमित शेतीवतील उध्वस्त करण्याची प्रकिया थांबविण्याची मागणी प्रहार सेवक शेरखान पठाण , एमबस चे पदाधिकारी मोहन दोडके वन हक्क समिती चे सचिव देविदास सहारे अध्यक्ष मनोहर गुळध्ये , वामन बावणे ,नाजूक नागोसे रघुनाथ मेश्राम ,अरविंद चौखे बबन धारणे सरपंच वैशाली नागोसे ईश्वर दडमल किशोर येसांबरे दिलीप खाटे मारोती वरटी आदी ग्राम सभा सदस्यांनी केलेली आहे.