पानोरा येथील जनता त्रस्त असून दुकानदार श्री शामराव शंकर खर्डीवार दुकान क्रमांक- R.CHN.CON.O69.1 लायसन नंबर-4314 यांचा परवाना रद्द करण्यात यावा अशी पानोरा येथील समस्त गावकऱ्यांची मागणी.
Bhairav Diwase. July 11, 2020
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) अमित उइके, गोंडपिपरी
गोंडपिपरी:- गोंडपिपरी तालुक्यातील येथून 13 किलो मीटर अंतरावर असलेल्या पानोरा येथील स्वस्त धान्य वितरण श्री शामराव शंकर खर्डीवार या दुकानदारा मार्फत केला जातो. परंतु सदर दुकानदार राशन चे बरोबर वाटप करीत नाही प्रती कार्ड धारकाच्या मागे 400 ते 500 ग्राम कमी धान्य वाटप करतो, तीस दिवस राशन वितरीत करायची तरतूद असून दोनच दिवस राशन देऊन मोकळे होतात, ई-पास मशीनद्वारे मिळत असलेली पावती मागितली असता रितसर पावती न देता अरे -रावीची भाषा बोलतात,शासनाने ठरवून दिलेल्या दरापेक्षा किलोमागे एक रुपया जादा दराने राशन देतात, लाँक-लाडावून मध्ये तीन महिन्याचे प्रत्येक कुटूंबातील व्यक्तीवर प्रत्येकी पाच किलो राशन द्यायचे होते पण त्या राशनचे कोणत्याच लाभार्थ्यांना नियमाने राशण वाटप करण्यात आले नाही.असा आरोप पानोरा येथील नागरिकांनी केला आहे.
एकीकडे लाकडाऊन मध्ये सरकार आणि प्रशासन गोरगरीब जनता उपाशी राहू नये यासाठी उपाययोजना करत आहे. मात्र अशा घटनांनी सरकारच्या प्रयत्नांना हरताळ फासला जात असल्याचे चित्र दिसून येत आहे
येथील राशन कार्ड धारकांना धान्य कमी देणे, यादीत नाव असूनही लाभार्थ्यांना धान्यापासून वंचित ठेवणे, याबद्दल ची विचारणा दुकानदारास केली असता नागरिकांना धमकी देणे आदी प्रकरणामुळे मौजा पानोरा येथील जनता त्रस्त असून दुकानदार श्री शामराव शंकर खर्डीवार दुकान क्रमांक- R.CHN.CON.O69.1 लायसन नंबर-4314 यांचा परवाना रद्द करण्यात यावा अशी पानोरा येथील समस्त गावकऱ्यांची मागणी आहे.