रोजगार हमी योजनेअंतर्गत कार्यरत कर्मचाऱ्यांना सेतू संस्थेमार्फत पुर्ननियुक्ती मिळण्याची कर्मचारी संघटनेची मागणी.

Bhairav Diwase

चिमूर येथे कोविड१९व खरिप आढावा बैठकीत खासदार अशोक नेते व आमदार बंटी भांगडीया यांना दिले निवेदन.

   Bhairav Diwase.    July 10, 2020

(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) अरविंद राऊत, चिमूर
चिमूर:-
चिमूर तालुक्यातील महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजने अंतर्गत कंत्राटी तत्वावर कार्यरत मागील२०११पासून महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेची कामे करीत आहेत वेळोवळी वरिष्ठांनी दिलेली जबाबदारी व कामे व्यवस्थित पार पाडत आहेत.तसेच महाराष्ट्र शासनाची महत्वाकांक्षी जलयुक्त शिवार योजना तसेच ३३कोटी वृक्षलागवड ,गाडमुक्त शिवार धडक सिंचन विहीर कार्यक्रम,पांदण रस्ते,प्रधानमंत्री आवास योजना,आधार सिडिंग,हरितसेना नोंदणी तसेच निवडणुकीच्या संदर्भातील कामे,केंद्रशासनाची कामे रोजगार हमी योजनेअंतर्गत पूर्ण करत आहेत.कोविड १९,सारख्या महामारीच्या काळात देखिल हे कर्मचारी आपल्या जीवांची पर्वा न करता कोणत्याही शासकिय सुविधा नसतानाही लॉकडाऊन च्या काळात मजुरांना कामे उपलब्ध करून देऊन रोजगार मिडवून दिलेला आहे.

  सन२०११ पासून महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना नियुक्ती देण्यात आली होती त्याच प्रमाणे आता सुध्दा इतर बाह्यस्थ संस्थेमार्फत नियुक्ती न देता कंत्राटी कर्मचारी यांनी आतापर्यंत केलेल्या कामाचा व अनुभवाचा विचार करून व इतर दुसऱ्या बाह्यस्थ संस्थेमार्फत पिडवणूक होऊ नये या करिता पुन्हा नियुक्ति देताना सेतू संस्थेमार्फतच द्यावी अशी मागणी करीत निवेदन दिले आहे.

     आज दिनांक १०/०७/२०२० ला चिमूर येथे झालेल्या बैठकीत चिमूर गडचिरोली लोकसभा क्षेत्राचे खासदार अशोक नेते व चिमूर विधानसभा क्षेत्राचे आमदार किर्तीकुमार (बंटी) भांगडीया यांना निवेदन देण्यात आले या वेळी चिमूर तालुक्यातील रोजगार हमी कर्मचारी योजनेतील कार्यरत संपूर्ण कर्मचारी उपस्थित होते.