भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखा पोंभूर्णा यांचे तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्री यांना निवेदन.
Bhairav Diwase. July 11, 2020
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) स्वप्निल मंडोगडे डोंगरहळदी तुकुम, पोंभुर्णा
पोंभुर्णा:- विश्वरत्न बोधिसत्व भारताचे संविधान निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे निवास स्थान असणाऱ्या राजगृहावर काही समाजकंटक माथेफिरूने दगडफेक केली. त्या भिषन हल्ल्याचा भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखा पोंभूर्णा निषेध करून या भ्याड हल्ल्याचा सूत्रधारांना व हल्लेखोरांना पकडून त्यावर कारवाई करावी अशी मागणी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तालुका शाखा पोंभुर्णा च्या वतीने तहसीलदार मार्फत मुख्यमंत्री यांना निवेदनाद्वारे केली आहे.
माथेफिरूने राजगृहावर खिडकी दरवाजावर दगडफेक करून काचा फोडल्या, त्यासोबत राजगृह परिसरात लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेरे व झाडांच्या कुंड्या तोडफोड करून संपूर्ण परिसरातील साहित्याची नासधुस केली आहे, त्यामुळे राजगृहात हल्ला केलेल्या हल्लेखोरांना तात्काळ अटक करा. या हल्ल्यामागे कोन आहेत त्यांना शोधा व त्यांना सुद्धा अटक करा. आंबेडकरी जनतेचा आक्रोश होण्यापूर्वी माथेफिरू अटक करा व आंबेडकर कुटुंबीयांना कायमस्वरूपी पोलिस संरक्षण द्या. यापुढे जनतेचे श्रद्धास्थान असलेल्या कोणत्याही वस्तूवर हल्ला होणार नाही याची खबरदारी घ्यावी आदी मागण्या निवेदनातून त्यांनी तहसिलदारामार्फत मुख्यमंत्री साहेबांना दिलेले आहे. जर या मागण्या येत्या सात दिवसात पूर्ण झाले नाही तर भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखा पोंभुर्णा कडून तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही या निवेदनात दिलेला आहे निवेदन देताना भारतीय बौद्ध महासभा चे तालुका अध्यक्ष अॅड रंजित खोब्रागडे, नारायण थेडकर संघटक, महेंद्र उराडे सुनील दुर्गे, राजू खोब्रागडे ,विजय दुर्गे, शालिक तेलसे, संदीप निमसरकार, प्रवीण खोब्रागडे, मायाताई मुन, संतोष कवटे व असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.