Top News

विदर्भ राज्य आंदोलन समिती पोंभुर्णा तर्फे “वीज बिल वापसी” आंदोलन.

सध्या स्थितीत प्रति युनिट जी आकारणी येते ही दोन्ही दरे निम्मे करण्यात यावी. दुष्काळ मुळे शेतीचे थकीत असलेले तीन वर्षापासूनचे वीज बिल माफ करण्यात यावे, शेतीला पूर्ण वेळ पूर्ण दाबाची वीज पुरविण्यात यावी, या मागण्या निवेदना द्वारे करण्यात आली.
 Bhairav Diwase.    July 11, 2020
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) स्वप्निल मंडोगडे डोंगरहळदी तुकुम, पोंभुर्णा
पोंभुर्णा:- लॉक डाउन काळातील सर्व वीज बिल माफ करण्यात यावे. यापुढे दोनशे युनिट पर्यंत वीज मोफत देण्यात यावी, यासह अन्य मागण्यासाठी विदर्भ राज्य आंदोलन समिती पोंभुर्णा तर्फे  “वीज बिल वापसी” आंदोलन करण्यात आले. 
संपूर्ण विदर्भासह पोंभुर्णातही आंदोलन करण्यात आले. चंद्रपूर जिल्ह्यातील हजारो नागरिकांनी आपले भरमसाठ आलेले वीज बिल वीज उपविभागीय अभियंता व वीज अधिकारी कार्यालयात परत केले.  चंद्रपूर जिल्ह्यातील , पोंभुर्णा या ठिकाणी नागरिक मोठया संख्येने आपले वीज बिल घेऊन गेले. तेथे अधिकाऱ्यांना कोरोना काळात भरमसाठ वीजबिल आल्याचे सांगून ते परत केले. या आंदोलनाचे नेतृत्व  गिरिधर सिंग बैस जेष्ठ विदर्भवादी नेते, बबन गोरंतवार माजी सरपंच तथा विदर्भवादी नेते पोंभुर्णा, अशोक गेडाम ज्येष्ठ विदर्भवादी नेते तथा प्रगतशील शेतकरी यांनी केले.  
लॉकडाउन काळातील वीज बिल माफ झालेच पाहिजे, दोनशे युनिट वीज मोफत मिळालीच पाहिजे, वीज बिल निम्मे करावे, शेतीचे वीज बिल माफ करावे, उपस्थित कार्यकर्त्यांकडून अशा घोषणा देत आंदोलन करून वीज बिल वापस करण्यात आले. पोंभुर्णा येथील विज वितरण कार्यालयात मंडळाच्या अधिकाऱ्यांनी समितीचे निवेदन व वीजबिल स्वीकारले. 
लॉकडाऊन काळात दोनशे युनिट पर्यंत वीज पुरवठा मोफत करण्यात यावा व सध्या दिलेली बिले परत घ्यावीत, घरगुती, शेती व औद्योगिक वापरासाठी आणि सध्या स्थितीत प्रति युनिट जी आकारणी येते ही दोन्ही दरे निम्मे करण्यात यावी. दुष्काळ मुळे शेतीचे थकीत असलेले तीन वर्षापासूनचे वीज बिल माफ करण्यात यावे, शेतीला पूर्ण वेळ पूर्ण दाबाची वीज पुरविण्यात यावी, या मागण्या निवेदना द्वारे करण्यात आल्या आहेत .निवेदन देताना जेष्ठ नेते वसंत पाटील मोरे, संजय बुरांडे माजी सरपंच, रत्नाकर कोवे माजी सरपंच,युवा  संदिप गव्हारे, आनंद पातडे, अशोक कंचर्लावार, एकनाथ पातडे, पत्रकार  अविनाश वाळके, ठावरदास उराडे, नंदकुमार वाकडे तथा असंख्य विदर्भवादी कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने