Click Here...👇👇👇

मुलगी कुटुंबाचा आधार.......

Bhairav Diwase




‘मुलगा म्हणजे वंशाचा दिवा’ हा समज मोडीत काढत ‘मुलगी हाच आमचा वारसा, अभिमान आणि स्वाभिमान’ असे मानणारे पालक म्हणजे समाजात परिवर्तन घडवून आणणारे ‘दूत’ च म्हणावे लागतील.
              स्त्रियांवर होणा-या अन्याय- अत्याचाराबाबत कुटुंबाची भूमिका खूपच महत्त्वाची ठरते. सासरच्या लोकांनी केलेली हि-या-मोत्यांच्या दागिन्यांची, कार-टू व्हीलर व इतर महागडय़ा वस्तूंची मागणी मुलीच्या माहेरच्या लोकांनी पूर्ण केली नाही, तर तिचा प्रचंड छळ होतो. हे ती माहेरी सांगत नाही, कारण त्यांचा पाठिंबा तिला मिळणार नाही, हे तिला माहीत असते आणि म्हणून मग ती स्वत:लाच संपवून टाकते. समाजात घडणा-या या घटना बघितल्या की, मुलीच्या अस्तित्वावर प्रश्न उपस्थित होतो.

सध्याचे युग आहे स्त्री-पुरुष समानतेच आहेे. या समानतेसाठी मुलगा व मुलगी ही एकाच पातळीवर आहेत. यासाठी स्त्रियांना, समाजसुधारकांना, संस्थांना अनेक वर्षे संघर्ष करावा लागला आहे. पण, परिस्थिती आजही संपूर्णपणे बदललेली नाही. कित्येक घरात आजही मुलीला मुलापेक्षा कमी दर्जाची वागणूक दिली जाते.
खाणे-पिणे, कपडालत्ता, शिक्षण, सुख सोयी-सुविधा या मुलाला जास्त पुरविल्या जातात कारण तो वंश पुढे नेणारा असतो. पित्याचे नाव लावून कुळाचा वारसदार असतो. मुलगी तर परक्या घरी नांदायला जाणार असते. त्यामुळे तिच्यापोटी जन्म घेणारा मुलगा जावयाच्या कुळाचे नाव लावणारा होणार. म्हणूनच तिला कदाचित समर्थ-आत्मनिर्भर बनविण्याकडे आई-वडिलांचा कल कमी असावा.
पुर्वीसारखी आजही मुलींच्या वडीलांच्या परिस्थितीकडे बघितल तर त्यामध्ये फारसा फरक झालेला जाणवत नाही. तर मुलींचा जन्म होताच तिच्या आई वडिलांना खर्चाची जाणीव जाणवते. पूर्वी एका घरात तीन-चार मुली असल्या तर त्या मुलींच्या आई-वडिलांना त्यांच्या लग्नाची, लग्नखर्चाची, वरपक्षाला देण्यात येणा-या रकमेची, संपूर्ण खानदानाला कराव्या लागणा-या मानपानाची आर्थिक चिंता मुलींच्या वडिलांपुढे चिंता जन्मभर सर्वच मुलींच्या बाबतीत त्यांना सतावित असते, म्हणून मुलीचा जन्म होणे हेच नकोसे वाटायचे.


या परिस्थितीमध्ये बद्दल घडवून आणायचा असेल, तर केवळ मुलामध्ये किंव्हा वर पक्षाला दोष देवून चालणार नाही. मुलींच्या वडीलांनी सुध्दा आपल्या विचार प्रणाली मध्ये व विचार करण्याच्या क्षमतेवर बदल करणे हे अत्यंत आवश्यक आहे. मुलगी ही दुसऱ्या घरची आहे. असा विचार न ठेवता ती जोपर्यंत वडीलांन कडे आहे. तो पर्यंत तीला योग्य ते शिक्षण देणे. जेणेकरून स्वत:च्या पायावर उभी राहिल आणि पुढे लग्न करत असतांना वडीलांना तीची काळजी जाणवणार नाही. आणि त्याबरोबर मुलींचे सुध्दा कर्तव्य आहे. आपण मुलगी म्हणून जन्माला आलो असलो. तरीही आपण मुलांपेक्षा कमी नाही. आपल्या कर्तृत्वाने सिध्द करून दाखवू आपण सक्षम आहो. हे जर सिध्द केल तर निश्र्चितच येणाऱ्या काळामध्ये मुलींच्या वडीलांची जी आज काळजी आहे. कमी होण्यास सहकार्य करेल.

याबाबतीत समाज काय म्हणेल, याची पर्वा न करता मुलाच्या आई-वडिलांनी प्रथम आपली स्वत:ची मानसिकता बदलली पाहिजे. मुलाला शिक्षण देऊन तुम्ही समर्थ बनविले आहे ना? मग घरात येणा-या नव्या सुनेच्या माहेरून पैशाची अपेक्षा का? महागडय़ा वस्तूंची मागणी कशासाठी? तुमच्या स्वत:मध्ये किंवा तुमच्या मुलामध्ये धमक नाही का या वस्तू घेण्याची? उपवर मुलांनी सुद्धा या गोष्टीचा विचार केला पाहिजे.

बाहेर समाज सुधारणांच्या गप्पा व घरात मुलींना जाचक वागणूक असे चित्र उपयोगाचे नाही. सर्वात प्रथम घरातच स्त्रीचा, मुलीचा सन्मान व्हायला हवा. हे बदल स्त्री-पुरुषांनी दोघांनी घरात-कुटुंबात-समाजात स्वीकारायला हवेत.
सध्या समाजात, सर्व धर्मांमध्ये हे चित्र बदलू पाहात आहे. मुलीला व मुलाला समान वागणूक देण्यात येत आहे, कारण आता ती काळाची गरज आहे. स्त्री गर्भाची हत्या करणा-या कुटुंबांना आता मुलीचा जन्म झाला तर आनंद वाटत आहे. ती मुलगी आपला आधार बनेल याची खात्री वाटू लागली आहे. मुलगा काय किंवा मुलगी काय यांच्या प्रती आपले कर्तव्य समानच असायला हवे आहे. मुलाचे वारसदार म्हणून कौतुक जरू करावे, पण मुलींनाही सरस्वती-लक्ष्मीचे प्रतीक समजून वागणूक दिली पाहिजे.

याबरोबरच दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे मुलींना मानसिक व शारीरिकदृष्टय़ा समर्थ बनविले पाहिजे. विविध प्रकारचे खेळ खेळल्याने मन कणखर बनते, वाईट परिस्थितीवर मात करण्याचे जणू शिक्षणच मिळते. निसर्गाने स्त्रीला जन्मत:च कणखर बनविले आहे. पण त्यांना रूढी-परंपरांच्या नियमात बांधून आपण त्यांना अबला करू बघत आहोत. मुलींवर बंधने योग्य अशी जरूर घालावीत, पण त्याची बेडी बनू देऊ नये.

सध्या आपल्या समाजात मुली सर्व क्षेत्रात उत्कृष्टपणे कार्यरत असताना दिसतात. वैद्यकीय, राजकीय, शैक्षणिक, सामाजिक, औद्योगिक तसेच व्यवस्थापन, केटरिंग व्यवसाय, हस्तकला, सौंदर्यशास्त्र, कपडय़ांचा व्यवसाय, ज्वेलरीमेकिंग इत्यादी क्षेत्रात आपल्या समाजातील मुलींनी नाव कमविले आहे.

म्हणुनच मला वाटते की, मुली या भार नव्हेत, तर दोन्ही कुटुंबाचा भक्कम आधार आहेत! मुलीला वाचवण्यासाठी एकीकडे वेगवेगळ्या योजना चालू असताना, मुलीच्या सुरक्षेचा प्रश्न सध्या दावणीवर लागला आहे.

(टिप:- मी लिहिलेला पहिला लेख असल्यामुळे वाईट, आक्षेपार्ह शब्द असलेल्या मला माफ करावे.)

लेख संकलन
कु. भैरव धनराज दिवसे
Tags