जाहिरात... Advertisement... विज्ञापन

दलित वस्तीवर होणाऱ्या अन्यायाच्या विरोधात घुग्गूस भाजपातर्फे उपोषण व विविध आंदोलने#chandrapur

चंद्रपूर:- रविवार 16 डिसेंबर रोजी दुपारी 12 वाजता घुग्घुस येथील बस स्थानक समोरील छत्रपती शिवाजी महाराज चौकात दलित वस्तीवर होणाऱ्या अन्यायाच्या विरोधात घुग्घुस भाजपातर्फे भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांच्या नेतृत्वात व भाजयुमोचे प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे यांच्या मार्गदर्शनात उपोषण सुरु करण्यात आले.
याप्रसंगी छत्रपती शिवाजी महाराज व महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांनी माल्यार्पण करून आंदोलनाची सुरुवात करण्यात आली.
घुग्घुस नगर परिषदेने घुग्घुस दलित वस्ती सुधार योजने अंतर्गत वार्ड क्र. 4 व वार्ड क्र. 5 व विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगरला सरसकट वगळल्यामुळे वार्डातील सिमेंट रस्ते व अंडरग्राउंड नाली बांधकामासाठी 3.5 करोड रुपयांचा निधी उपलब्ध होऊ शकला नाही. या वार्डातील सर्व दलित बांधवांवर हेतूपुरस्पर अन्याय करण्यात येत आहे.
जोपर्यंत वार्ड क्र. 04 व 05 ला निधी मिळत नाही व दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई होत नाही तोपर्यंत हे उपोषण असेच सुरू राहणार आहे.

   पहिल्या दिवशी उपोषणाला माजी उपसरपंच संजय तिवारी, माजी पं.स. उपसभापती निरीक्षण तांड्रा,  माजी सरपंच राजकुमार गोडसेलवार, माजी ग्रामपंचायत सदस्य सिनू इसारप, पूजा दुर्गम व  माजी तंमुस अध्यक्ष मल्लेश बल्ला सोबत असंख्य कार्यकर्त्यांनी सुरुवात केली आहे.
    यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे, माजी सरपंच संतोष नुने, जेष्ठ नेते पूनम शंकर,  माजी ग्रामपंचायत सदस्य वैशाली ढवस,महेश लठ्ठा, विक्की सारसर, दीपक मिसाला, गुरूदास तग्रपवार, विकास बारसागडे, योगेश सारसर, गणेश मोहुर्ले, रवी बडगुलवार उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत