Top News

निबंध स्पर्धेत स्वाती लेनगुरे प्रथम #award #Essay

पोंभुर्णा:- नेहरू युवा केंद्र पोंभुर्णा आणि पाहणारे डोळे मदतीचा हात बहुउद्देशीय सामाजिक संस्था उमरी पोद्दार यांच्या संयुक्त विद्यमाने उमरी पोद्दार येथे "कोरोना मुळे शिक्षण व्यवस्थेवर झालेला परिणाम" या विषयावर निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये स्वाती मारोती लेनगुरे प्रथम क्रमांक, भिमराव प्रेमदास मेश्राम द्वितीय क्रमांक, तर अशिष अनिल लेनगुरे तृतीय क्रमांक पटकाविला.

कोरोनामुळे शिक्षण व्यवस्था कशी कोलमडली आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर व देशाच्या भवितव्यावर कसा दूरगामी परिणाम झाला व भविष्यात शिक्षण धोरणे कशी असायला हवी याचे लालित्यपूर्ण वर्णन विद्यार्थ्यांनी आपल्या निबंधामध्ये केले. यावेळी कोरोनाचे सर्व उपाययोजना आखून कार्यक्रम पार पाडण्यात आला.
कार्यक्रमाला उपस्थित अध्यक्ष म्हणून लाभलेले राजीव गांधी हायस्कूल चे शिक्षक श्री माननीय वाकडे सर यांनी परीक्षकाची धुरा सांभाळली तर श्री माननीय रमेश शेंडे तसेच शुभम कोसनकर संस्थेचे अध्यक्ष अंकुश उराडे व संस्थेलील सभासद यांच्या हस्ते विजेत्यांना सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र देण्यात आले व प्रत्येकी सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
यावेळी नेहरू युवा केंद्राचे प्रतिनिधी व संस्थेचे सर्व सदस्य उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने