जाहिरात... Advertisement... विज्ञापन

बिबी येथे सावित्रीबाई महिला बचत गट तर्फे हळदी कुंकू कार्यक्रम #Korpana

भेटवस्तू देऊन महिलांचा सन्मान
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) सतीश बिडकर कोरपना
कोरपना:- कोरपना तालुक्यातील बिबी येथील सावित्रीबाई महिला बचत गटातर्फे महिला सक्षमीकरणासाठी विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात येते. मकर संक्रांतीच्या निमित्ताने दरवर्षीप्रमाणे यंदाही बचत गटातर्फे जिल्हा परिषद शाळेच्या पटांगणात हळदी कुंकू कार्यक्रम घेण्यात आला.
कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून पंचायत समिती सदस्य सविता काळे, कमला ढवस, अंजना काळे, सुधा मोरे, संगीता ठाकरे, स्वाती कोडपे, कांता सुर्यगंध, चंद्रकला क्षिरसागर उपस्थित होते. बचत गटांनी एकत्र येवून विविध उपक्रमातून आपले कौशल्य सिद्ध करावे व स्वावलंबी व्हावे असे मत प्रास्ताविकातून स्नेहल उपरे यांनी मांडले.
बचत गटाच्या अध्यक्षा सुनीता पावडे, उपाध्यक्ष पूजा खोके, कोषाध्यक्ष कुंदा चटप, निर्मला गिरडकर, इंदू काळे, अल्का पिंगे, सुनिता अंदनगर, माया घुगुल, मीरा बोबडे, लता आस्वले यांनी या उपक्रमासाठी विशेष सहकार्य केले. मकर संक्रांती हा स्नेहाचे, प्रेमाचे नाते घट्ट करण्याचा उत्सव असून महिलांनी यानिमित्ताने संघटित होऊन समाजाभिमुख कार्यासाठी पुढे यावे, असे मत मान्यवरांनी व्यक्त केले.
यावेळी गावातील महिलांना हळदी-कुंकू लावून बचत गटातर्फे भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन साक्षी पाचभाई तर आभार निर्मला गिरटकर यांनी मानले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत