माजी नगराध्यक्षाच्या पतीची विहिरीत उडी घेत आत्महत्या. #Suicide

Bhairav Diwase

ब्रम्हपुरी:- ब्रम्हपुरी येथील नगर परिषदेच्या माजी नगराध्यक्षा छायाताई तुमाने यांच्या पतीने मालडोंगरी येथील विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज दि १६ जानेवारीला उघडकीस आली. आत्महत्या केलेल्या इसमाचे नाव पुरूषोत्तम तुमाणे वय ६५ वर्ष रा. गुजरी वार्ड ब्रम्हपुरी असे आहे. ते माजी नगराध्यक्ष छायाताई तुमाने यांचे पती आहेत. मृत्यूचे कारण अद्याप गुलदस्त्यात असून, सदर घटनेचा पुढील तपास ब्रम्हपुरी पोलीस उपनिरीक्षक राजेश उंदीरवाडे हे करीत आहेत.