पडोली ते तिरवंजा सीसीरोडचे काम तात्काळ पूर्ण करा:- आ. किशोर जोरगेवार

मार्गाची केली पाहणी, नागरिकांच्या सोईसाठी वन वे सुरु करण्याचे सूचना.
Bhairav Diwase.    July 31, 2020

(आधार न्यूज नेटवर्क ग्रामीण प्रतिनिधी) नागेश्वर गणेशकर, चंद्रपुर
चंद्रपूर:- पडोली ते तिरवंजा या दुतर्फा मार्गाच्या निर्मितीचे काम अतिशय संथ गतीने सुरु आहे. परिणामी दोन वर्ष लोटूनही सदर मार्ग पूर्ण झालेला नाही. त्यामुळे येथे अपघातांचे प्रमाण वाढले असून नागरिकांना प्रवासा दरम्यान चांगलीस अडचण निर्माण होत आहे. त्यामुळे याकडे गांभीर्यपूर्ण लक्ष देत या रोडचे काम जलद गतीने करण्याचे निर्देश आमदार किशोर जोरगेवार यांनी दिलेत  तसेच काम पूर्ण झालेला  वन वे दोन दिवसात सुरु करण्याचे निर्देशही यावेळी दिले आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत