मा.आ.सुधीरभाऊ मुनगंटीवार यांचा वाढदिवस 'सेवा दिन' म्हणुन जिल्हाभर साजरा करणार.

Bhairav Diwase
घुघुस येथे वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रम संपन्न होणार:- देवराव भोंगळे जिल्हाअध्यक्ष भाजपा चंद्रपूर
Bhairav Diwase.    July 28, 2020

(आधार न्यूज नेटवर्क ग्रामीण प्रतिनिधी) नागेश्वर गणेशकर, चंद्रपुर
चंद्रपूर:- लोकनेते सुधीरभाऊ मुनगंटीवार यांचा 30 जुलै रोजी वाढदिवस, दरवर्षी मोठ्या उत्साहाने जिल्हाभर साजरा करण्यात येतो. यावर्षी सुद्धा माननीय आमदार सुधीरभाऊ मुनगंटीवार यांचा वाढदिवस जिल्हाभर सेवा दिन म्हणून साजरा करण्यात येणार आहे. घुघुस येथे सुद्धा विविध उपक्रमाद्वारे सुधीर भाऊंचा वाढदिवस साजरा करण्यात येणार आहे.

घुग्गुस शहरात विविध उपक्रम घेण्यात येनार आहे. यात प्रामुख्याने मोफत जन-धन खाते उघडणे शिबिर, निराधार योजना शिबिर, राशन कार्ड वाटप शिबिर, गुणवंत विद्यार्थी सत्कार, गोरगरीबांना धान्यकिट वाटप करण्यात येनार आहे. 

मागील अनेक वर्षांपासून घुग्गुस येथील मा.आ.सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्राच्या वतिने गोरगरिबांच्या कल्याणासाठी अनेक योजना राबवण्यात येत आहेत. यात प्रामुख्याने उज्वला गॅस योजना, राशनकार्ड काढुन देने, मतदार यादीत नाव नोंद करणे, आयुष्मान भारत योजना, अंबुलन्स सेवा, नागपूर, वर्धा, चंद्रपूर येथे रुग्णांना रक्त पुरवठा करणे, बचत गटांना अर्थसहाय्य व मार्गदर्शन अश्या विविध शासकिय योजना राबविली जातात.

दरवर्षी मा.आ.सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या वाढदिवसा निमीत्य घुगुस व पोंभुर्णा येथे मोठ्या स्तरावर भव्य रोग निदान व शस्त्रक्रिया शिबिर आयोजित करण्यात येत होते. या शिबिराचा लाभ जवळपास पंधरा ते वीस हजार लोक घेत होते. परंतु कोरोनाच्या पार्श्वभुमीवर एवढ्या मोठ्या प्रमाणात लोकांचा जमाव करता येत नसल्यामुळे शिबिर घेता येत नाही म्हणून खबरदारी करीता यावर्षी विविध उपक्रमाद्वारे सेवा दिन म्हणुन वाढदिवस साजरा करण्यात येनार आहे असे भाजपा जिल्हाअध्यक्ष देवराव भोंगळे यांनी कळविले आहे. 

घुग्गुस परिसरातील जनतेने सहभागी व्हावे असे आव्हान घुग्गुस भाजपा शहराध्यक्ष विवेक बोढे, जि. प. सभापती नीतू ताई चौधरी, प.स. उपसभापती निरीक्षण तांड्रा, सरपंच संतोष नुने, ग्रामपंचायत सदस्य संजय तिवारी, राजकुमार गोडसेलवार, प्रकाश बोबडे, साजन गोहने, सिनु इसारप, पूजा दुर्गम, कुसुमताई सातपुते, लक्ष्मीताई नलभोगा, सुचीता लुटे, वैशाली ढवस, नंदाताई कांबळे, सुषमा सावे, तंटामुक्तीचे अध्यक्ष हसन शेख यांनी केले आहे.