दहावीचा निकाल उद्या जाहीर होणार.

Bhairav Diwase

उद्या दुपारी १ वाजता अधिकृत संकेतस्थळावर निकाल दिसणार.

Bhairav Diwase.    July 28, 2020

(आधार न्यूज नेटवर्क ग्रामीण प्रतिनिधी) नागेश्वर गणेशकर, चंद्रपुर
चंद्रपूर:-
SSC Result 2020: इयत्ता दहावीच्या निकालासाठीची प्रतीक्षा अखेरीस आज संपत आहे. महाराष्ट्र शिक्षण मंडळाच्या माहितीनुसार, उद्या, 29 जुलै रोजी दुपारी 1 वाजता इयत्ता दहावीचा निकाल जाहीर केला जाणार आहे. उद्या दुपारी निकाल जाहीर झाल्यावर mahresult.nic.in सहित maharashtraeducation.com, results.mkcl.org, mahahsscboard.maharashtra.gov.in, mahahsscboard.in या अधिकृत वेबसाईट्वर तुम्हाला तुमचे गुण तपासता येतील. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेतल्या जाणाऱ्या दहावीच्या परीक्षेला यंदा राज्यातून 17 लाख 65 हजार 898 विद्यार्थी बसले होते.

यंदा दहावीची परीक्षा 4979 परीक्षा केंद्रांवर पार पडली आहे, कोरोनाच्या संकटामुळे दहावीचा शेवटचा म्हणजेच भूगोलाचा पेपर रद्द करण्यात आला होता, या विषयात सरासरी गुण देऊन विद्यार्थ्यांचा निकाल जाहीर केला जाईल.

mahresult.nic.in वर कसा पहाल निकाल?

 🔴अधिकृत वेबसाईट mahresult.nic.in वर जा.

🔴या वेबसाईटवरील रिझल्ट लिंकवर क्लिक करा.

🔴त्यानंतर तुमचा सीट नंबर, रजिस्ट्रेशन नंबर आणि डेट ऑफ बर्थ इत्यादी माहिती टाकून एंटर करा.

🔴तुमचा निकाल स्क्रिनवर झळकेल. तो निकाल तुम्ही डाऊनलोडही करु शकता.