सीडीसीसी बँकेचे अध्यक्ष पाऊणकर व सीईओ दुबेंना पोलिस कोठडी.

Bhairav Diwase
अनुकंपा तत्वावर नोकर भरती प्रकरण.
Bhairav Diwase.    July 29, 2020

(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) वैभव एनपल्लीवार, चंद्रपूर
चंद्रपूर:- चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी (सीडीसीसी) बँकेतील २४ कर्मचाऱ्यांच्या पाल्यांना अनुकंपा तत्वावर नोकरभरती करून त्यात मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल असलेले बँकेचे अध्यक्ष मनोहर पाऊणकर व बँकेचे सीईओ सिध्दार्थ दुबे यांनी काल २७ जुलैला दुपारी आर्थिक गुन्हे शाखेत शरणागती पत्करली होती. त्यानंतर त्यांना अटक करून आज दि.२८ जुलैला रामनगर पोलिस ठाण्यातून व्हीडीओ कॉन्फरन्स द्वारे न्यायालयात पेशी करण्यात आली. न्यायालयाने ३० जुलै पर्यंत दोघांनाही पोलिस कोठडी सुनावली आहे. अध्यक्ष व सीईओदोघेही फरार होते. या दरम्यान दोघांनीही जामिनासाठी जिल्हा न्यायालय व मुंबई उच्च न्यायालयाचे नागपूर खंडपीठात जामिनासाठी अर्ज केला होता. दोन्ही न्यायालयाने जामिन फेटाल्यानंतरही अध्यक्ष व सीईओ फरार होते. काल सोमवारी दुपारी अध्यक्ष मनोहर पाऊणकर व सीईओ दुबे यांनी आर्थिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक मकेश्वर यांच्या समोर शरणागती पत्करली. त्यानंतर दोघांनाही अटक करण्यात आली. आज त्यांना आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेने रामनगर पोलिस ठाण्यातून न्यायालयापुढे व्हीडीओ कॉन्फरन्सींगद्वारे हजर करण्यात आले. न्यायालयाने दोघांनाही ३० जुलै पर्यत पोलिस कोठडी सुनावली आहे.