Top News

प्रशासनाची दिशाभूल करणाऱ्या कोरोणा बाधित रुग्ण तथा संबंधित कुटुंबियांवर नगरपालिका प्रशासनाने केला गुन्हा दाखल.

जावयाच्या मेहरबाणीने सासुरवाडी क्वारंटाईन नागरिकांत भीती चे सावट लॉक डॉऊन मुळे कोरोना साखळी तुटेल? जनतेचा प्रश्न
Bhairav Diwase.    July 29, 2020

(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) सतीश बिडकर कोरपना
कोरपना:-
गडचांदूर् येथे अमरावती वरून दाखल कोरोना बाधित रुग्णाचा बेजबाबदार पणाने शहरातील ११नागरिकांना कोरोनाची लागण झाली सदर रुग्ण हा अमरावती वरून एका खाजगी वाहनाने गडचांदूर् शहरात दाखल झाला.त्यानंतर तो कोरोना (covid १९)ची तपासणी करिता ते कोविड सेंटर (सावित्रबार्इं फुले महाविद्यालय गडचांदूर् )येथे पोहचवले व कोविड १९ करिता आरटी पिसीअार चाचणी करिता गेला.परंतु आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्याना स्वतःचा योग्य पत्ता व दूरध्वनी क्रमांक न देता तसेच तिथे न थांबता किंवा आरोग्य विभागाला किंवा नगर परिषदेला कोणालाही न कळवता परस्पर नातेवाईकाकडे निघून गेला. सदर रुग्णाने दारूची जंगी पार्टी केली.पार्टीत सहभागी असलेले सर्वांनी (कोविड १९) तपासणी करण्यात आली.व सर्व नागरिकांचे सकारात्मक अहवाल आले.करिता गडचांदुर् शहरामध्ये नगर परिषदेद्वारे संस्थात्मक विलागिकरणाची व्यवस्था करण्यात आली आहे.परंतु  सदर नागरिक kovid सेंटर मधून परस्पर  निघून गेला.व त्यामुळे संसर्गाची बाधा झाली .त्यामुळे सदर ईसमावर व त्यांच्या नातेवाईकावर माहिती लपवणे .स्थानिक प्रशासनाची दिशाभूल करणे या अंतर्गत साथ रोग प्रतिबंात्मक कायदा १८६७ आपती व्यवस्थापन अधिनियम २००५(५१-b)भारतीय दंड संहिता १८६०चे कलम १८८.२६९.२७१.२९०अंतर्गत एकूण ३ व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या पूर्वी  औरंगाबाद ते नागपूर ते गडचांदुर आलेल्या कोरोना बाधित व्यक्ती चा कुटुंब बियावर स्थानिक प्रशासनाची दिशाभूल करणे करिता गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने