Click Here...👇👇👇

आ. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या तर्फे तोहगाव मध्ये आर्सेनिक अल्बम 30 या होमिओपॅथिक पॅथी गोळ्यांचे वाटप.

Bhairav Diwase
1 minute read
Bhairav Diwase.    Aug 27, 2020
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) अमित उइके, गोंडपिपरी
गोंडपिपरी:- आ. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या तर्फे तोहगाव मध्ये आर्सेनिक अल्बम 30 या होमिओपॅथिक पॅथी गोळ्यांचे वाटप करण्यात आले.
तोहगाव चे रहिवासी असलेले श्री. करण (बंङू) गौरकार यांना आपल्या गाव परिसरातील नागरिकांचे कोरोना या व्हायरस पासुन संरक्षण होण्याच्या दृष्टीने नागरिकांची रोगप्रतिकार शक्ती वाढ व्हावी या हेतुने त्यांना या गोळ्यांचे वाटप व्हावे असे वाटत होते.
श्री. करण गौरकार आणी श्री. सुभाष कासनगोट्टूवार यांनी यासंदर्भात आ. सुधीरभाऊ मुनगंटीवार  यांना विनंतीत केले. ..
"हो नक्कीच" असे म्हणुन आ. सुधीरभाऊ यांनी यात मदत केली आणि तोहगावमध्ये आर्सेनिक अल्बम 30 या होमिओपॅथिक गोळ्यांचे वाटप करण्यात आले...
यावेळीस तोहगाव चे सरपंच हंसराज रागीट, ज्येष्ठ नेते प्रकाश उत्तरवार, श्री. बंङू भाऊ दुर्गे, श्री. अतुल बुक्कावार, श्री. संदिप बुक्कावार,  श्री. सौरव मोरे उपस्थित होते.
आपल्या गावकरी यांना आरोग्य सुरक्षेच्या दृष्टीने आर्सेनिक अल्बम 30 या गोळ्यांचे वाटप व्हावे हि इच्छा श्री.  करण (बंङू) गौरकार यांनीच व्यक्त केली होती. याच विनंतीवरून आणि आ. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या तर्फे वाटप करण्यात आले.
.या वेळी नागरिकांना आरोग्य नियमांचे पालन करा असे आवाहन करण्यात आले. नागरिकांनी आ. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांचे आभार मानले..