Top News

विहिरगाव येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार.

Bhairav Diwase. Aug 19, 2020



(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) राहुल थोरात, राजुरा
राजुरा:- दिनांक 18 ऑगस्ट 2020 ला साईबाबा कनिष्ठ महाविद्यालय येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा पार पडला. समाज कार्यामध्ये हिरहिरीने भाग घेणारी संस्था जेसीआय राजुरा रॉयल्स, नवराष्ट्र चे युवा पत्रकार जाकिर अली सय्यद व युवा सामाजिक कार्यकर्ते आसिफ सय्यद या तिघांच्या संयुक्त विद्यमानाने हा सत्कार सोहळा पार पाडण्यात आला .
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विहिरगाव चे उपसरपंच इर्शाद शेख, बक्षीस वितरक म्हणून राजुरा रॉयल च्या अध्यक्ष सौ सुषमा शुक्ला, तसेच प्रमुख पाहुण्यांमध्ये साईबाबा कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य श्री लोहे सर ,कॉलेज चे लिपिक श्री भाऊजी वांढरे ,जिल्हा परिषद हायस्कूल विहिरगाव चे माजी मुख्याध्यापक श्री गजानन चव्हाण सर, जिल्हा परिषद हायस्कूल विरगाव चे विद्यमान मुख्याध्यापक श्री जयपाल राऊत सर उपस्थित होते.
हा कार्यक्रम माझी मुख्याध्यापक श्री. नरेश बोभाटे व विहिरगाव च्या माझी प्राथमिक शिक्षिका सौ सुशीला पोरेड्डीवार यांच्या सौजन्याने घेणायत आला.
या प्रसंगी गुणवंत विद्यार्थी व त्यांचे पालक उपस्थित होते.
सर्व गुणवंत विध्यार्थ्यांना प्रमाणपत्र, सन्मानचिन्ह व बक्षीस देऊन त्यांचे सत्कार करणयात आले. या कार्यक्रमाचे संचालन कान्हाळगाव चे शिक्षक श्री स्वतंत्र कुमार शुक्ला तर आभार प्रदर्शन रामकीसन यांनी केले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने