लंप्पी रोगाचा प्रसार रोखण्यासाठी मदत मागूनही मदत न मिळाल्याने सरपंच भालचंद्रभाऊ बोधलकर आणि ग्रामस्थामध्ये नाराजी.

जामतुकुम येथे लसीकरण शिबिर आयोजित करण्यात यावे:- सरपंच बोधलकर , ग्रामस्थांची मागणी.
Bhairav Diwase. Aug 19, 2020
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) स्वप्निल मंडोगडे डोंगरहळदी तुकुम, पोंभुर्णा
पोंभुर्णा:- चंद्रपूर जिल्ह्यात सर्वत्र जनावरांवरील संसर्गजन्य रोग लंपीस शेतकऱ्यांची झोप उडविलेली आहे. ऐन कामाच्या वेळेस जनावरे आजारी पडत असल्याने शेतकरी बांधव हतबल झालेले आहे. लंप्पी हा रोग संसर्गजन्य असल्याने आजारी जनावरांची संख्या फार झपाट्याने वाढत आहे.
पोंभुर्णा तालुक्यातील जामतुकुम येथील गाई, बैल यांच्या वर लंप्पी रोगाचा प्रसार होत असल्याने लवकरात लवकर जामतुकुम येथे लसीकरण शिबिर आयोजित करण्यात यावे अशी मागणी सरपंच बोधलकर, ग्रामस्थांनी केली आहे.

लसीकरणासाठी डॉ. बोकडे आणि डॉ. भुसारी यांना वारंवार फोन लावून सुद्धा कोणत्याही प्रकारची प्रतिक्रिया मिळत नाही आहे. गेल्या अनेक दिवसांपासून डॉक्टर बोकडे यांना संपर्क साधला असता ते फोनच उचलत नाही आहे. तर डॉ भुसारी ना फोन केला पण ते म्हणतात सुरुवातीला तिथे आले होते त्यामुळे आत्ता येणे शक्य नाही. असं सांगत आहेत पण सरपंच साहेबांनी त्यांना सांगितलं सुरुवातीला लंप्पी रोग नसल्याने शिबिर आयोजित केलेला नव्हता. परंतू आता लंप्पी रोगाचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात वाढल्यामुळे शिबिर आयोजित करण्यात येत आहे. पण डॉक्टर साहेब टाळाटाळ करत आहेत. तसेच सगळ्या अधिकाऱ्यांना सांगून सुद्धा यावर उपाय योजना करत नाही आहे.
:- भालचंद्रभाऊ बोधलकर
सरपंच
ग्रामपंचायत जामतुकुम

वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आधार न्यूज नेटवर्कने प्रकाशित केलेल्या बातमीची दखल घेत. ताबडतोब जामतुकुम येथे लंप्पी रोगाचा प्रसार रोखण्यासाठी शिबिर आयोजित करावा:- सरपंच बोधलकर, ग्रामस्थ जामतुकुम

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने