महाराष्ट्राची लालपरी, लवकरच धावणार जिल्ह्याबाहेर.

Bhairav Diwase
चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. विजय वडेट्टीवार यांनी दिली माहीती.
Bhairav Diwase. Aug 19, 2020


(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) राहुल थोरात, राजुरा
राजुरा:- कोरोना या विषाणूजन्य आजारामुळे 25 मार्च 2020 पासून जवळपास मागील 4 महिन्यापासून बंद असलेली राज्यातील आंतरजिल्हा एसटी बससेवा कोविड बाबतचे नियम पाळून सुरू करण्यात येणार असल्याची माहिती पालकमंत्री ना. विजय वडेट्टीवार यांनी दिली असल्याची माहिती आहे या संदर्भात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री अनुकूल असून यांच्याशी सकारात्मक चर्चा झाली असून पुढील आठवडयात या संदर्भात काही ठोस निर्णय होण्याची शक्यता विश्वसनीय सूत्रांनी माहिती दिली आहे.
याशिवाय राज्यातील कोचिंग क्लासेस सुध्दा कोरोना संदर्भात नियम पाळून सुरू करण्याची राज्य सरकारची तयारी आहे ज्याप्रमाणे जिम सुरू केले आहे त्याच धर्तीवर कोचिंग क्लासेस सुरू करण्याची शासनाचा विचार सुरू आहे.
दरम्यान लॉकडाउन सुरू झाले तेव्हाच राज्यातील लालपरी म्हणून ओळखली जाणारी एसटी बस सेवा बंद करण्यात आली होती हळूहळू सर्व सेवा पूर्वपदावर येत असताना अनलॉक प्रक्रिया सुरू असताना निर्बधं शिथिल होत असताना मर्यादित प्रमाणात एसटी बस सेवेला परवानगी देण्यात आली होती व 50% प्रवासी संख्येसह एसटी बस सेवा सद्यस्थितीत केवळ जिल्ह्यातर्गत सुरू आहे मात्र मा. ना. विजय वडेट्टीवार (पालकमंत्री, चंद्रपूर) यांनी दिलेल्या माहितीनुसार एसटी अर्थात लालपरी ला असलेली जिल्हाबंदी लवकरच उठण्याची शक्यता आहे त्यामुळे एकप्रकारे प्रवाशानाही जिल्हाबंदीतून काही अंशी सुटका मिळण्याची शक्यता आहे अशी माहिती विश्वसनीय सूत्राच्या माहितीनुसार प्राप्त झाली आहे.