राजुरा:- राजुरा-गडचांदूर मार्गावरील कापनगाव जवळ राजुरा येथून पाचगाव कडे जाणाऱ्या एका ऑटोला विरूध्द दिशेने येणाऱ्या हायवा ट्रक ने जबर धडक दिली.
या घटनेत ६ प्रवाशी ठार झाले असून एका गंभीर प्रवाश्याला चंद्रपूर जिल्हा रूग्णालयात रेफर करण्यात आले आहे. तर एकावर राजुरा उपजिल्हा रूग्णालयात उपचार सुरू आहेत. दिनांक २८ ऑगस्ट २०२५ रोजी दुपारी ४ वाजता ही दुर्देवी दुर्घटना घडली.
या दुर्घटनेत रवींद्र हरी बोबडे, वय ४८, राहणार पाचगाव, शंकर कारू पिपरे, वय ५०, राहणार कोची, सौ. वर्षा बंडू मांदळे, वय ४१, राहणार खामोना, तनु सुभाष पिंपळकर, वय १८, राहणार पाचगाव, ताराबाई नानाजी पापुलवार, वय 60 वर्ष, राहणार पाचगाव आणि ऑटो चालक प्रकाश मेश्राम, वय ५० वर्ष, राहणार पाचगाव या सहा प्रवाशांचा मृत्यू झाला.
याव्यतिरिक्त चंद्रपूर जिल्हा रुग्णालयात निर्मला रावजी झाडे, वय ५० वर्षे, पाचगाव यांना चंद्रपूर जिल्हा रूग्णालयात रेफर करण्यात आले असून भोजराज महादेव कोडापे, वय ४० वर्षे, भुरकुंडा यांचे वर राजुरा उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.