Top News

गोंडपिपरी शहरात मोकाट जनावराचा सुळसुळाट

जनता त्रस्त नगरपंचायत प्रशासन सुस्त.

जनावराचा बंदोबस्त न झाल्यास भाजप युवा मोर्चा तर्फे अनोखा आंदोलन करण्याचा इशारा.
Bhairav Diwase.   Aug 07, 2020

(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) अमित उइके, गोंडपिपरी
गोंडपिपरी:- गोंडपिपरी शहरात मागील काही  महिन्यापासून जुन्या बसस्थानका जवळ मोठ्या प्रमाणावर मोकाट जनावरांचा सुळसुळाट आहे  जनावरामुळे अपघात होत असतात, पायदळ चालणाऱ्या नागरिकांना त्रास सहन करावा लागतो तसेच जुन्याबसस्थानकवर मुख्य बाजारपेठ, भाजीपाला मार्केट आहे हा रहदारी चा प्रमुख मार्ग असल्याने जनतेला  मोकाट जनावरांचा सामना करावा लागतो या संबंधात सभेमध्ये नगरसेवक राकेश पुन यांनी मुद्दा उपस्थित केला होता परंतु झोपेत असलेल्या प्रशासनाला अजून पर्यंत जाग आलेली नाही काल दि.५/८/२० रोजी भाजप युवा मोर्चा तर्फे मुख्याधिकारी यांना निवेदन देण्यात आले नगर पंचायत यांनी  5 दिवसाचे आत मोकाट जनावराचा बंदोबस्त केला नाही तर ही जनावरे नगर पंचायत समोर आणून निषेध करण्यात येईल असा इशारा भाजप युवा मोर्चाचे जिल्हा सचिव राकेश पुन यांनी दिला आहे याप्रसंगी माजी न.प.उपाध्यक्ष चेतन गौर,  नाना येल्लेवार, सुनील फुकट , प्रज्वल बोबाटे व इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने