Top News

काँग्रेस नेत्यांनी मागितला दारूचा हप्ता.

पोलिसांना देता तर आम्हाला हि पाहिजे हफ्ता.

दारू बंद करण्याऐवजी हफ्ता घेऊन खुले आम विक्री करण्याचा सल्ला.
Bhairav Diwase.    Aug 07, 2020

(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) सतीश बिडकर कोरपना
कोरपना:- अनलॉक वन सुरू होताच जिल्ह्यामध्ये दारूचा महापूर सुरू झाला असून तेलंगाना ची दारू व्हाया पांढरकवडा – वणी आता कोरपना नांदा फाटा गडचांदूर राजुरा परिसरात दाखल होत आहे. जुने डीलर यांनी आता मोहल्ला कमिट्या बनविणे सुरू केले असून अत्यंत नियोजन पद्धतीने प्रत्येक घरापर्यंत दारू पोहोचविण्याचे नेटवर्क तयार करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.

अशीच एक घटना सध्या गडचांदूर करांमध्ये चर्चेचा विषय झाली असून काँग्रेस पक्षाच्या एका नवनियुक्त पदाधिकाऱ्याच्या यजमानांनी अवैध दारू विक्रेत्यांची मीटिंग घरी बोलावून
‘तुम्ही पोलिसांना हप्ता देता माझ्या वार्डात दारू विकायची असेल तर मला ही हप्ता द्यावा लागेल’ असे बजावले. 
उलट वॉर्डात दारू बंद करण्याऐवजी हफ्ता मागून दारू सुरु करण्याला समर्थन केले 
“आम्ही तुम्हाला निवडणुकीत भरपूर मदत केली आता निवडून येताच आम्हालाच पैसे मागता.”

“पैसे तर देता येणार नाही परंतु तुमच्या रोजच्या दिवसरात्र पिण्याची सोय करू” असे पतीदेव महाशयांच्या एका जुन्या मित्राने बजावले.  त्यातीलच एकाने नाव न सांगण्याच्या अटी वर हि माहिती आमच्या प्रतिनिधी ला दिली. 
आमदार खासदार असलेल्या पक्षाच्या नेत्याने धमकीवजा इशारा केल्यामुळे दारू विक्रेत्यांचे धाबे दणाणले आहेत. 

एकाला दिले तर सर्वांनाच द्यावे लागतील त्यामुळे सदर नेत्यावर पक्षाच्या संपर्क सूत्रांकडून दबाव आणून प्रकरण मिटवले जाण्याची शक्यता आहे.

‘अवैध दारू विक्री बाबत नेत्यांनी मोहल्ला कमिटीचे मीटिंग भरवून मागितला हिस्सा’ सध्या खमंग चर्चेचा विषय झाला आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने