तंत्रज्ञानाचा वापर शेतकऱ्यांना तारेल... ब्रिजभूषण पाझारे यांचे प्रतिपादन

Bhairav Diwase
हिंगनाड्यात शेतमजुरांसाठी २दिवसीय कौशल्य प्रशिक्षण शिबिर.
Bhairav Diwase.    Aug 07, 2020

(आधार न्यूज नेटवर्क सहसंपादक) अरविंद राऊत, चिमूर
चिमूर:- शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवायच्या असेल तर त्यांना आधुनिक शेती कडे वळावे लागेल.तंत्रज्ञानाचा वापर करूनच निसर्गाच्या अवकृपेवर मात मिळविता येऊ शकते.तंत्रज्ञानाचा वापरच शेतकऱ्यांना तारेल असे प्रतिपादन जी प सदस्य ब्रिजभूषण पाझारे यांनी केले.ते शेतमजुरांसाठी  तालुका कृषी अधिकारी कार्यालय मार्फत आयोजित दोन दिवसीय कृषी विषयक कौशल्य प्रशिक्षण शिबिरात आज गुरुवार (६ऑगस्ट)ला उदघाटन प्रसंगी हिंगनाडा येथे कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून बोलत होते.*
*यावेळी तालुका कृषी अधिकारी श्री वहाणे, उप कृषी अधिकारी रवींद्र मनोरे,मंडळ कृषी अधिकारी श्री गायकवाड,ग्रा.प.सदस्य शंकर लोनगाडगे,ठेंगणे,कंनाके, पोलीस पाटील साखरकर यांची प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती होती.
पाझारे म्हणाले, लोकनेते आ सुधीरभाऊ मुनगंटीवार सत्तेत असतांना त्यांनी बळीराजाची दखल घेत विधायक कार्य केले.मागेल त्याला शेततळे ,शेतशिवार योजना,मामा तलावाचे खोलीकरण,असे अनेक उपक्रम त्यांनी राबविले.तर आता कोरोनाच्या संकटात पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे आहेत.त्याची फलश्रुती म्हणून हे कौशल्यविकास शिबीर होत आहे.शेतकरी-शेतमजुरांनी याचा लाभ घ्यावा.अश्या प्रकारचे हे,जिल्ह्यातील पाहिले शिबीर आहे,असेही ते म्हणाले.
६आणि७ ऑगस्टला दोन दिवस हे शिबीर शामराव लोनगाडगे यांच्या शेतावर आयोजित करण्यात आले असून शेतकऱ्यांना व शेत मजुरांना कीटकनाशकाची सुरक्षित फवारणी,हाताळणी व वापर (कापूस पीक) चे प्रशिक्षण दिले जात आहे
प्रारंभी माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेला पाझारे यांनी माल्यार्पण करून विधिवत उद्घाटन केले* प्रस्ताविक श्री भोई यांनी केले.रवींद्र मनोरे यांनी आभार मानले.