Click Here...👇👇👇

गेडामगुड्याच्या समस्यांकडे बिबी ग्रामपंचायतीचे हेतुपुरस्पर दुर्लक्ष.

Bhairav Diwase
आदिवासी नेते भारत आत्राम यांचा आरोप.
Bhairav Diwase.    Aug 07, 2020
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) सतीश बिडकर कोरपना
कोरपना:- कोरपना तालुक्यातील बिबी गट ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या गेडामगुडा या गावात शुद्ध पिण्याचे पाणी नसल्याने गावकऱ्यांनी 'आर.ओ. वाटर प्लांट' लावण्याची मागणी ग्रामसेवक यांचेकडे केली आहे. 
विशेष म्हणजे सदर गाव हे संपूर्ण आदिवासी आहे. बिबी ग्रामपंचायतीला पेसा कायद्याचा लाभ मिळतो. मात्र, पेसा निधी आदिवासी समुदायाच्या आवश्यक मूलभूत गरजांवर योग्य रित्या खर्च होत नसून  गेडामगुड्याच्या समस्यांकडे बिबी ग्रामपंचायतीचे हेतुपुरस्पर दुर्लक्ष होत असल्याचे मत आदिवासी नेते भारत आत्राम यांनी मांडले. 
        बिबी ग्रामपंचायतीत २५ लाखाहून अधिक निधी हा स्मार्ट ग्राम योजनेतील अखर्चित आहे. इतकेच नव्हे तर पेसा अंतर्गत आदिवासी समुदायाच्या कल्याणासाठी विशेष निधी प्राप्त होतो. परंतु, गेल्या ४ वर्षात आमच्या गेडामगुड्याच्या समस्यांना प्राथमिकता दिली नाही असे मत मुरलीधर गेडाम यांनी मांडले. 

दरम्यान, पिण्याचे शुद्ध पाणी मिळावे म्हणून गावकऱ्यांनी सोशल डिस्टनसिंगचे पालन करत गावकऱ्यांनी ग्रामसेवक यांना निवेदन दिले. याआधी बिबी गटग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या धामणगाव येथील नागरिकांनी देखील शुध्द पाण्यासाठी निवेदन दिले होते. तिथे भूमिपूजन होऊन पाच महिने झाले, निधी वितरित झाला तरी देखील वाटर एटिमचा बोर्ड वगळता प्रत्यक्षात काहीही दिसत नाही, हे समोर आले होते. आता,  गेडामगुड्यातील लोकांनी निवेदन देत पिण्याच्या शुद्ध पाण्यासाठी आवाज उठवला आहे. पेसा अंतर्गत येणाऱ्या ग्रामपंचायतीला आदिवासी समुदायाकडे दुर्लक्ष होत असेल तर हे दुर्दैवी वाटते. उपलब्ध निधीतून तातडीने आर.ओ. वॉटर एटीएम गेडामगुडा येथे सुरू करावे अशे अनिल गेडाम, मुरलीधर गेडाम, संदीप कोटनाके, नंदलाल जुमनाके, बाजीराव गेडाम, सुभाष सोयाम, वनमाला जुमनाके, प्रज्योत सुरपाम आदी गावकऱ्यांनी निवेदनात म्हटले आहे. आता ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच व सत्ताधारी सदस्य यांच्या भूमिकेकडे लक्ष लागले आहे.