अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ तालुका शाखा- गोंडपिपरीने घेतले रक्तदान शिबिर.

५३ रक्तदात्यांनी केले रक्तदान.
Bhairav Diwase.    Aug 06, 2020

(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) अमित उइके, गोंडपिपरी
गोंडपिपरी:- अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ तालुका शाखा गोंडपिपरी ने दिनांक ५/८/२०२०ला ११:००ते ३:००या वेळेत रक्तदान शिबिर घेतला. या प्रसंगी ५३रक्तदात्यांनी रक्तदान केले.
         सदर रक्तदान शिबिराच्या प्रसंगी उद्घाटण 
कार्यक्रमाच्या वेळेस मा.सौ.सुनिता भानेश येग्गेवार , सभापती पं.स.गोंडपिपरी.मा.
अमरभाऊ बोडलावार ,माजी जिल्हा परिषद सदस्य,मा.मनिष वासमवार,माजी पंचायत समिती उपसभापती,मा.बुलकुंडे साहेब , संवर्ग विकास अधिकारी, पंचायत समिती गोंडपिपरी.मा.आवारी साहेब गटशिक्षणाधिकारी, पंचायत समिती गोंडपिपरी.मा.गंधारे सर, जिल्हा नेते , अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ, जिल्हा चंद्रपूर,मा.आळे सर , जिल्हा अध्यक्ष , अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ, जिल्हा शाखा चंद्रपूर.मा.अभय कासनगोटूवार सर, सल्लागार,मा.सतिष बावणे , सल्लागार, तसेच शिक्षण विभागातील विस्तार अधिकारी, केंद्र प्रमुख उपस्थिती होते.
           कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात संघटणेचे अध्यक्ष श्री.प्रेम खोब्रागडे यांनी रक्तदान शिबिर आयोजित करण्याचा उद्देश स्पष्ट करतांना शिक्षक हा समाजाचा महत्त्वाचा घटक असून कोव्हिड१९ च्या  महामारी प्रसंगी तो सामाजिक कार्यात आपले उत्तरदायित्व तो पूर्ण करणार हा संकल्प घेऊन संघटनेने हा उपक्रम घेतला आहे असे मत
व्यक्त केले. शिक्षक संघटना म्हणून हा उपक्रम राबविणारी या कोरोणा काळातील एकमेव संघटना असल्याचा उल्लेख केला. कार्यक्रमाचे
संचालन श्री.महेश ताटेवार , सरचिटणीस, अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ तालुका शाखा गोंडपिपरी यांनी केले.
     या प्रसंगी उपस्थित मान्यवरांनी या सामाजिक उदात्त उपक्रमास शुभेच्छा दिल्या.रक्तदान शिबिराच्या यशस्वितेसाठी श्री.डाॅ.पेंदाम साहेब, वैद्यकीय अधिकारी ग्रामिण रुग्णालय गोंडपिपरी.श्री.केदार सर, सहसचिव,श्री.मिरदोडीवार , कार्याध्यक्ष,श्री.नरूले सर,श्री.कानकाटे सर, कोषाध्यक्ष, श्री.कोकरे सर,सौ.कारेकार मॅडम, महिला आघाडी प्रमुख,कु.भगत मॅडम,श्री.सचिन बावणे सर,श्री.गाते सर,श्री.दिनेश निमकर सर कु.कुनघाडकर मॅडम  तसेच तालुका सघटणेचे पदाधिकारी यांनी सहकार्य केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत