आमदार किशोर जोरगेवार यांचे निर्देश, तात्काळ २५ हजार रुपयांची आर्थिक मदत.
Bhairav Diwase. Aug 06, 2020
चंद्रपूर:- कंत्राटी पध्दतीवर जिल्हा सामान्य रुग्णालयात आरोग्य सेविका म्हणून कार्यरत असलेल्या संगीता पाटील यांचा कर्तव्यावर असतांनाच मृत झाल्याची घटना काल मंगळवारी घडली. उपचाराअभावी सदर महिला कर्मचा-याच्या मृत्यू झाल्याचा आरोप होत आहे. दरम्यान आज बुधवारी आमदार किशोर जोरगेवार यांनी रुग्णालयाला भेट देत सदर घटणेची माहिती घेतली असून मृत महिला कर्मचा-याच्या कुटुंबातील एका सदस्याला तात्काळ नौकरी देण्याचे निर्देश दिले आहे. तसेच मृत महिलेला तात्काळ २५ हजारांची तात्काळ आर्थिक मदत दिली आहे. यावेळी जनविकास सेनेचे अध्यक्ष तथा नगरसेवक पप्पू देशमूख, कामगार युनियनचे अॅड. शैलेश मुंजे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. सुरपाम, निवासी वैद्यकीय अधिकारी भास्कर सोनारकर, जिल्हा शल्य चिकित्सक निवृत्ती राठोड, डॉ. अनंत हजारे आदिंची उपस्थिती होती.