Bhairav Diwase. Aug 06, 2020
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) वैभव एनपल्लीवार, चंद्रपूर
चंद्रपूर:- सि.एस.टी.पी.एस.येथील प्रकल्पग्रस्तांचे आंदोलन सोडविण्यासाठी आमदार किशोर जोरगेवार यांचे सातत्याने प्रयत्न सूरु असून येथील प्रकल्पग्रस्तांच्या मागण्याबाबत आमदार किशोर जोरगेवार यांनी आज गुरुवारी राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, उर्जामंत्री नितीन राऊत, पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्याशी आंदोलकर्त्यांना समक्ष दुरध्वनी वरुन चर्चा केली आहे. यावेळी आ. जोरगेवार यांच्या पुढाकाराने प्रकल्पग्रस्त सचिन ठाकरे यांनीही दूरध्वनीद्वारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा केली या विषयासंदर्भात तोडगा काढण्याचे आश्वासन यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देत सदर आंदोलन स्थगित करण्याची विनंती केली. विषेश म्हणजे आज सकाळपासूनच आमदार किशोर जोरगेवार यांची आंदोलनस्थळी उपस्थिती आहे.