Top News

महावितरणच्या हरंबा उपकेंद्राचे काम पूर्ण. आवश्यक असलेल्या चाचण्या महावितरणकडून सुरु.

Bhairav Diwase.    Aug 06, 2020
   
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) राकेश एम गोलेपल्लीवार जिबगांव, सावली
 सावली:- महावितरणच्या वतीने सावली तालुक्यातील हरंबा येथे नव्याने उभारण्यात आलेल्या ३३ कि.व्हो. वीज उपकेंद्राचे काम पूर्ण झाले असून,आवश्यक असलेल्या चाचण्या महावितरणकडून सुरु करण्यात आल्या आहेत. चाचण्या पूर्ण झाल्यावर हे वीज उपकेंद्र सुरु करण्यात येईल. दीनदयाळ उपाध्याय ग्राम ज्योती योजनेत वीज उपकेंद्राचे काम झाले आहे. या वीज उपकेंद्रातून ११ किव्हे हरंभा , दोनला, देवटोक हे फीडर्स काढण्यात आले आहेत. यामुळे चेकपिरंजी, सिंडोळा , उसगाव,जिबगाव,शिर्शी, साक्री, देवटोक,डोनाला या गावातील सुमारे ५,५०० वीज ग्राहकांना होणार आहे.  सध्या उपकेंद्रात चाचण्या सुरु असल्याने वरील  गावातून जाणाऱ्या वीज वाहिन्यांपासून खबरदारी म्हणून दूर राहण्याचे आवाहन महावितरणकडून वीज ग्राहकांना करण्यात आले आहे. या वीज वाहिन्यांना आपली गुरे बंधू नयेत, वीज वाहिनीखाली पिकाचे ढीग न रचण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने