सोशल मीडिया पोर्टल च्या सर्व पत्रकाना माजी आमदार संजय धोटे यांच्या हस्ते स्वच्छता किट व गौवरपत्राचे वाटप.
भाजपचे जेष्ठ कायरकर्ते शर्माजी यांचा सत्कार.
Bhairav Diwase. Aug 16, 2020
कोरपना:- गडचांदूर येथे भारतीय जनता पक्षाच्या वतीने कोरोना संकट काळात मा श्री सुधीर भाऊ मुनगंटीवार माजी अर्थ नियोजन व वने महाराष्ट्र राज्य यांच्या संकल्पनेतून भाजपा महिला मोर्चा महाराष्ट्र प्रदेश च्या वतीने गौरवपत्र सोशल मीडिया पोर्टल च्या पत्रकारानि अतुलनीय कार्य केले त्याबद्दल त्यांचा सत्कार करून त्यांना गौरव प्रमाणपत्र देण्यात आले,
संपूर्ण देशात कोरोना या विष्णूचे थैमान घातले असताना लॉक डाऊन मध्ये पत्रकार आपल्या जीवाची पर्वा न करता जनतेच्या सेवेत कार्य सुरू होते, त्यांच्या कार्याची दखल घेऊन भाजप महिला मोर्च्या च्या वतीने रक्षबांधनाचे औचित्य साधून यामध्ये न्यूज 34 चे मुमताज अली, दीपक खेकारे, आधार न्यूज नेटवर्क पोर्टलचे सतिश बिडकर, लोकमत चे मयूर एकरे, विनोद हरणे, व इतर पत्रकार बांधवाना गौरव प्रमाणपत्र देण्यात आले.
यावेळी भाजपचे जेष्ठ कार्यकर्ते शर्माजी, यांनी कोरोना काळात गरजू व गरीब कुटुंबांना खूप सहकार्य केले त्या बद्दल त्यांचा शाल, श्रीफळ व पुष्प गुच्छ देऊन माजी आमदार संजय धोटे यांच्या हस्ते सत्कार कररण्यात आला यावेळी पक्षाचे जेष्ठ कार्यकर्ते शिवाजी सेलोकर, सतिश धोटे, निलेश ताजने, अरविंद डोहे नगरसेवक, रामा मोरे नगर सेवक, संदीप शेरकी, सतिश उपलनचीवार, कोरे, अजीम, हरिषजी घोरे, राकेशजी अरोरा, इम्रान पाशा शेख, शेख मुस्तकीम, प्रतीक उराडे, सचिन वाढई, योगेंद्र केवट उपस्थित होते.