आ. किशोर जोरगेवार यांच्या मागणीला यश, धार्मीक सणांच्या पार्श्वभूमीवर तात्पुरते छोटे दुकाने लावण्यास परवाणगी.

Bhairav Diwase
Bhairav Diwase. Aug 12, 2020

(आधार न्यूज नेटवर्क ग्रामीण प्रतिनिधी) नागेश्वर गणेशकर, चंद्रपुर
चंद्रपूर:- ऑगष्ट, सप्टेंबर आणि ऑक्टोंबर महिण्यात अनेक धार्मीक सन आहेत. या पार्श्वभूमीवर पात्पूरते स्वरुपातील छोटे दूकाने लावण्याची परवाणगी देण्यात यावी अशी मागणी आमदार किशोर जोरगेवार यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली होती. या मागणीची दखल घेत छोटे दुकाने लावण्याची परवाणगी देण्यात आली असून तसा आदेशही पारित करण्यात आला आहे. त्यामूळे या सणांवर अवलंबून असलेल्या छोटया व्यावसांयीकांना दिलासा मिळाला आहे.