चंद्रपुर जिल्ह्यात बैल पोळा सार्वजनिकरीत्या साजरा न करण्याच्या सूचना:- पोलिस अधीक्षक डॉ महेश्वर रेड्डी

Bhairav Diwase. Aug 12, 2020

(आधार न्यूज नेटवर्क सहसंपादक) अरविंद राऊत, चिमूर
चंद्रपूर:- कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. याकाळात विविध सण उत्सव साजरे करण्याविषयी प्रशासनाकडून मार्गदर्शक सूचना येत आहेत. बैल पोळा हा उत्सव सार्वजनिकरीत्या साजरा न करण्याबाबत सूचना देण्यात आली आहे.
सोमवार १७ ऑगस्ट व मंगळवार १८ ऑगस्ट रोजी बैल पोळा उत्सव आहे. सदर उत्सव सार्वजनिकरीत्या साजरा न करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. बैलांची जाहीर मिरवणूक काढण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. त्याच प्रमाणे बैलांना मिरवणुकीने एकत्रीत रित्या मंदिरे आदी ठिकाणी नेण्यास मनाई करण्यात आली आहे. सर्व शेतकर्‍यांनी त्यांचे घर आणि परिसरात पोळा साजरा करावा असे आदेश देण्यात आले आहे. आदेशाचे उल्लंघन केल्यास कारवाई करण्यात येणार आहे. असे पोलिस अधीक्षक डॉ महेश्वर रेड्डी यांनी सांगितले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या