Top News

प्रधानमंत्री किसान ट्रॅक्टर योजनेची जाहिरात बनावट.

शेतकऱ्यांनी भुलथापाला बळी न पडता सतर्कता बाळगण्याच्या कृषी आयुक्तालयाच्या सूचना.

Bhairav Diwase. Aug 12, 2020

(आधार न्यूज नेटवर्क सहसंपादक) अरविंद राऊत, चिमूर

चिमूर:- प्रधानमंत्री किसान अशा आशयाची पोस्ट सध्या समाज माध्यमामध्ये मोठ्या प्रमाणात प्रसारित केली जात असून त्याद्वारे शेतकऱ्यांची दिशाभूल केली जात असल्याचे निदर्शनास येत आहे 'प्रधानमंत्री किसान ट्रॅक्टर योजना अशा नावाची कोणतीही योजना अस्तित्वात नाही किंवा याबाबत केंद्र शासनाकडून कोणतीही सूचना प्राप्त नाही.

सन २०२०-२१ अंतर्गत राज्यामध्ये केंद्र पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण उप अभियान आनी एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान या योजनाअंतर्गत ट्रॅक्टर साठी अनुदान अनुज्ञेय आहे यासाठी शासनाच्या mahadbtmahait.gov.in या पोर्टलवर अर्ज स्वीकारण्यात येणार असून ऑनलाईन लॉटरी पद्धतीने जेष्ठता क्रमवारी निश्चित करून उपलब्ध निधीच्या प्रमानात पूर्वसंमती देण्यात येणार आहे.पुर्वसंमती प्राप्त झाल्यानंतर ट्रॅक्टर खरेदी करणाऱ्या शेतकऱ्यांनाच अनुदान लाभ देण्यात येणार आहे.

कृषी यांत्रिकीकरण उप अभियानाचे संदर्भात दी.१४ जुलै २०२० चे शासन निर्णयानुसार ट्रॅक्टर साठी अनुदानाचे दर घोषित करण्यात आले आहेत त्यानुसार अनु.जाती.अनु.जमाती ,अल्प व अत्यल्प भूधारक आनी महीला शेतकऱ्यांना किमतीच्या ५०% किंवा रुपये १.२५ लाख यापैकी कमी असेल ते आणी इतर शेतकऱ्यांना किमतीच्या ४०% किंवा रुपये २ लाख यापैकी कमी असेल ते या प्रमाणे अनुदान अनुज्ञय राहील.

कृषी यांत्रिकीकरण उप अभियानाचे अंमलबजवणीसाठी क्षेत्रीय स्तरावर अद्याप कोणत्याही सूचना देण्यात आलेल्या नाहीत.शासनाकडून वित्तिय मान्यता होताच जिल्हानिहाय लक्षांक कळविण्यात येईल.अशा सूचना कृषी आयुक्तालय संचालक पुणे यांचेकडून देण्यात आल्या आहेत.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने