कोरोणा काळात कर्तव्यदक्ष अधिकाऱ्याच्या बदलीने जिल्हा परिषदेतुन नाराजीचा सूर.
Bhairav Diwase. Aug 12, 2020
चंद्रपूर:- चंद्रपूर जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी, डॉ.कुणाल खेमणार यांची झालेली बदली रद्द करण्यात यावी.असा ठराव जिल्हा परिषदेच्या स्थायी समिती बैठकीत मंजूर करण्यात आला.
डॉ.कुणाल खेमणार हे चंद्रपूर जिल्ह्याला लाभलेले प्रभावी, मितभाषी आणि सर्वसामान्यांना सहज उपलब्ध होणारे अधिकारी आहेत.संपूर्ण जगावर आलेल्या कोरोणा महामारीसारख्या वैश्विक संकटाला तोंड देत असतांना चंद्रपूर सारख्या औद्योगिक जिल्ह्याची कमान त्यांनी यशस्वीरित्या सांभाळली. यासोबतचं जिल्ह्यातील अनेक समस्या आदि प्रश्नांना निकाली काढण्यात त्यांना यश आले आहे. आज दिवसागणिक जिल्ह्यात कोरोणाबाधितांची संख्या वाढत आहे. अशा परिस्थितीत आरोग्य यंत्रणेसह प्रशासनाला चालवितांना त्यांनी एक कार्यक्षम अधिकारी म्हणून आपले नेतृत्व सिद्ध केलेले आहे. अशा कार्यक्षम अधिकाऱ्याचा अभिनंदनपर प्रस्ताव आजच्या स्थायी समिती सभेत मंजूर करण्यात आला.
यासोबतचं,डॉ.खेमणार यांची अचानक बदली होणे योग्य नाही. त्यामुळे त्यांची ही बदली रद्द करण्यात यावी असा ठरावही सर्वानुमते मंजूर करण्यात आला.