कु.अलकाताई आत्राम सभापती पंचायत समिती पोंभूर्णा यांच्या हस्ते उद्घाटन.
Bhairav Diwase. Aug 12, 2020
पोंभुर्णा:- नगरपंचायत पोंभुर्णा येथे जागतिक आदिवासी दिनानिमित्त तालुका कृषी अधिकारी पोंभुर्णा यांच्यावतीने रानभाजी महोत्सव घेण्यात आला. या कार्यक्रमाचे उद्घाटन सभापती पंचायत समिती पोंभूर्ण कु. अल्काताई अत्राम यांच्या हस्ते करण्यात आले व कार्यक्रमाप्रसंगी सहभागी शेतकऱ्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र वाटप करण्यात आले. सदर कार्यक्रमाला पोंभुर्णा तालुक्यामधून शेतकऱ्यांनी विविध रानभाज्या सह उपस्थित होते. सदरच्या भाजीपाला जंगली असल्यामुळे नैसर्गिक सेंद्रिय रित्या, विना रासायानिक, विविध औषधी गुणधर्म असल्यमुचे शेतकऱ्यांना महत्त्व पटवून देण्यात आले.
सदर कार्यक्रमाला कवडुजी कुंदवार सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती पोंभुर्णा, सौ ज्योती बुरांडे उपसभापती पंचायत समिती पोंभूर्णा, श्री गजानन गोरंटीवर नगरसेवक पोंभूर्णा, सौ.सुनिता मॕकलवार नगरसेविका , डॉ. निलेश खटके तहसीलदार, श्री सिद्धार्थ मेश्राम मुख्याधिकारी नगरपंचायत, धनंजय साळवे गटविकास अधिकारी पोंभुर्णा, राजेश दुबे उमेद प्रकल्प व्यवस्थापक उपस्थित होते .
यावेळी श्री चंद्रकांत निमोड तालुका कृषी अधिकारी पोंभुर्णा यांनी सर्वांचे स्वागत करून रानभाज्या विषयी माहिती दिली .सदर कार्यक्रम यशस्वी करण्याकरीता शहाजी शिंदे ,प्रदीप बारामते. कृषी अधिकारी श्री संदीप पहापळे ,श्री पवन नगराळे कृषी पर्यवेक्षक व कृषी सहाय्यक कृषी मित्र आकाश वासमवार टाटा ट्रस्ट प्रतिनिधी यांचे सहकार्य लाभले. या कार्यक्रमाला नागरीकांनी भरभरून प्रतिसाद दिला.