चंद्रपूरातून उत्तम अधिकारी घडावेत:- आ. किशोर जोरगेवार.

यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने युपीएससी व एमपीएससी परिक्षेत उर्त्तीण झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार.
Bhairav Diwase. Aug 16, 2020
(आधार न्यूज नेटवर्क ग्रामीण प्रतिनिधी) नागेश्वर गणेशकर, चंद्रपुर
चंद्रपूर:- चंद्रपूर जिल्ह्यातील विद्यार्थी शिक्षण क्षेत्रात कौतूकास्पद कामगीरी करत असून जिल्हाचे नाव लौकीक करत आहे. दिवसागणीक येथील विद्यार्थी उंच भरारी घेत आहे. हि जिल्ह्यासाठी गौरवाची बाब आहे. आता विपरीत परिस्थितीत युपीएससी आणि एमपीएससीच्या परिक्षेतही येथील विद्यार्थ्यांनी मोठे यश प्राप्त केले आहे. या विद्यार्थ्यांची प्रेरणा घेत इतर विद्यार्थ्यांनी युपीएससी आणि एमपीएससीच्या परिक्षेची तयारी करावी असे आवाहण करत येत्या काळात चंद्रपूरातून उत्तम अधिकारी घडावेत अशी आशा आमदार किशोर जोरगेवार यांनी व्यक्त केली यंग चांदा ब्रिगेडच्या विद्यार्थी विभागाच्या वतीने यंग चांदा ब्रिगेडच्या कार्यालयात युपीएससी व एमपीएससी परिक्षत उर्त्तीण झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी ते बोलत होते. यावेळी यंग चांदा ब्रिगेडच्या विद्यार्थी शाखेचे प्रमूख अजय दुर्गे, महिला शहर संघटिका वंदना हातगावकर, संघटक, राजू जोशी कलाकार मल्लारप, विश्वजित शाहा राहुल मोहुर्ले आदिंची उपस्थिती होती.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या