जिल्हाधिकाऱ्यांच्या बदली विरोधात जन विकास सेनेचे आंदोलन.

Bhairav Diwase
उद्यापासून सर्वपक्षीय आंदोलन करणार.
Bhairav Diwase.   Aug 11, 2020

(आधार न्यूज नेटवर्क ग्रामीण प्रतिनिधी) नागेश्वर गणेशकर, चंद्रपुर
चंद्रपूर:- काल अचानक चंद्रपूरचे जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांची बदली करण्यात आली.शासनाने केलेल्या या बदलीच्या विरोधात जन विकास सेनेचे अध्यक्ष नगरसेवक पप्पू देशमुख यांच्या नेतृत्वात आज दिनांक 11 ऑगस्ट रोजी दुपारी एक वाजता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर डोळ्यावर पट्टी बांधून आंदोलन करण्यात आले. जिल्हाधिकारी हे पेशाने डॉक्टर आहेत.मागील चार महिन्यापासून covid-19 आपत्तीचे अतिशय चांगल्या पद्धतीने व्यवस्थापन करीत आहेत.कोविडची आपत्ती आल्यानंतर तीन महिन्यापर्यंत चंद्रपुरात एकही पॉझिटिव्ह रुग्ण मिळाला नाही यामध्ये जिल्हाधिकारी यांच्या नियोजनाचं व त्यांच्या नेतृत्वात चतुर्थश्रेणी कर्मचारी ते अधिकारी व कंत्राटी कामगार या सर्वांच्या टीमने अतिशय चांगले काम केलेले आहे. जिल्हाधिकारी यांना चंद्रपुरात केवळ दोन वर्ष झाले. प्रामाणिक व होतकरू अधिकारी असलेले डाॅ.खेमनार यांनी जिल्ह्यातील सामान्य नागरिकांच्या मनात एक वेगळे स्थान निर्माण केले आहे.